Now 10 thousand rupees fine for tobacco sellers in aarmori 
विदर्भ

तंबाखू खाणाऱ्यांचे होणार वांदे! आता तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई; होणार इतक्या हजारांचा दंड..  

प्रशांत झिमटे

आरमोरी (जि. गडचिरोली) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरमोरी शहर 100 टक्‍के तंबाखूमुक्त करण्यासाठी आरमोरी किराणा असोसिएशन व मुक्तिपथ अभियानाची वाटचाल सुरू आहे. यासाठी 15 जुलै रोजी मुक्तिपथ व किराणा असोसिएशन यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व किराणा विक्रेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता.  मात्र आता तंबाखू विकल्यास विक्रेत्यांवर मोठी कारवाई होणार आहे.  

पुन्हा 30 जुलै रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर आरमोरी किराणा असोसिएशन 10 हजारांचा दंड आकारणार तसेच असोसिएशनच्या निर्णयाला न जुमानता तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्या जाईल असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. 

तंबाखू विक्रीत 50 टक्‍क्‍यांनी घट

तसेच असोसिएशनच्या पुढाकाराने आरमोरी शहरातील तंबाखू विक्रीत 50 टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याचा दावा किराणा असोसिएशनने केला असून तंबाखूमुक्त शहराकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे निश्‍चितच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व छुप्या मार्गाने खर्राविक्रीवर अंकुश लागणार आहे.

पोलिस करणार स्वतंत्र कारवाई

मुक्तिपथ आणि पोलिस प्रशासनाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आरमोरी किराणा असोसिएशनने तंबाखू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांना दिली. पोलिस अधीक्षक यांनी सर्व पोलिस स्टेशनला तंबाखू विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरमोरी पोलिस मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून मुजोर तंबाखू विक्रेत्यांवर स्वतंत्र कारवाई करीत 100 टक्‍के तंबाखूमुक्त आरमोरी शहर करू, अशी ग्वाही ठाणेदार सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी मुक्तिपथचे तालुका संघटक निलम हरीणखेडे उपस्थित होत्या. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT