bajar samiti.j 
विदर्भ

करावे तरी काय? बाजार समितीतही आता कोरोनाचा प्रवेश!

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कितीही काळजी घेतली तरी कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. आतातर बाजार समितीमधील खरेदीदारांच्या दुकानांतील दोन मदतनीसांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा प्रवेश बाजार समितीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील वातावरण त्यामुळे भयग्रस्त झाले आहे.
दरम्यान, बाजार समिती व्यवस्थापनाने शिवनगरसह मसानगंज परिसरातील कामगार, व्यापारी, खरेदीदार व अडते यांना बाजार समितीत येऊ नका असे बजावले आहे.
बाजार समितीत काम करणारे पन्नासच्या जवळपास अडते, खरेदीदार व हमाल मसानगंज व शिवनगर परिसरातून येतात. अशातच येथे काम करणा-या दोघांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही व्यक्ती खरेदीदारांच्या दुकानांत मदतनीस म्हणून काम करणारे आहेत. शेतकरी, अडते, हमाल व मापारींसोबत त्यांचा संबंध आला आहे. त्यामुळे बाजार समितीत भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.मसानगंज, चेतनदास बगीचा व शिवनगर परिसरात कोरोना संक्रमणाचा वाढता आलेख बघता या परिसरातील खरेदीदार, अडते व हमालांना बाजार समितीत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
या परिसरातून कामासाठी येणा-यांची संख्या पन्नासच्या जवळपास असल्याचे बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले. यापूर्वी हाथीपुरा, हैदरपुरा, नागपुरीगेट व खोलापुरी गेट भागातील लोकांना कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.
दोन मदतनीसांच्या मार्गाने संक्रमणाचा प्रवेश झाल्याने बाजार खबरदारी म्हणून बाजार समिती बंद करायची का यावर मंथन सुरू आहे. संक्रमणग्रस्त परिसरातील लोकांचा संचार राहिल्यास संसर्ग त्यांच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांनी तूर्तास बाजार समिती बंद करण्यास नकार दिला आहे. यासाठी त्यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीस जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती व्यवस्थापनाला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...

बाजार समिती सुरू राहणार
पेरणीचा हंगाम तोंडावर असल्याने बाजार समिती बंद करता येणार नाही. संक्रमण रोखण्याकरीता व संसर्ग होणार नाही यासाठी संक्रमीत भागातील लोकांना प्रवेश नाकारण्यात येत असून निर्जंतूकीकरणासह सोशल डिस्टन्स व इतर खबरदारी घेण्यात येत आहे. बाजार समिती सुरूच राहणार असून बंदचे आदेश नाहीत, असे सचिव दीपक विजयकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT