file photo 
विदर्भ

Video : आता जनावरांवर या रोगाने केले आक्रमण...पशुपालक शेतकरी झाले चिंतित

सुधाकर दुधे

सावली (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पशुधनावर "लंपी' (त्वचा रोग) या विषाणूजन्य साथीच्या रोगाने आक्रमण केले आहे. जवळपास पाचशे जनावरांना याची लागण झाली आहे. त्याळे पशुपालकांनी चिंता व्यक्त केली आहे. शेतीत रोवणीचे काम सुरू आहे. त्यातच या साथीच्या आजाराने थैमान घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतीकामासाठी अनेक शेतकरी पशुपालन करीत आहेत. जनावरांची काळजी घेणे, बैलांची वापर शेतीसाठी करणे आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांनी जनावर पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र सध्या जनावरांच्या शरीरावर गाठी, शरीरावरील ग्रंथीला, पायाला, पोळीला सूज आदी सोबतच ताप, अशक्तपणा ही लक्षणे जनावरांत दिसून येत आहेत.

त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. सध्या रोवणीचा हंगाम असल्याने या कामासाठी बैलांची आवश्‍यकता भासत असते. मात्र बैलांना लंपी या रोगाने ग्रासल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

१४ रुग्णालयांत केवळ १२ पशुवैद्यकीय अधिकारी

सावली तालुक्‍यात १४ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. श्रेणी एकमध्ये दोन, तर श्रेणी दोनमध्ये १२ रुग्णालये आहेत. ज्यामध्ये सावली, बोथली, पाथरी, पालेबारसा, उपरी, सामदा, केरोडा, व्याहाड बुज, चिचबोडी, विहरगाव, निमगाव, निफंद्रा, जिबगाव व लोंढोली आदी गावांचा यात समावेश आहे. मात्र १४ रुग्णालयांत केवळ १२ पशुवैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत. त्यामुळे जनावरांना तपासताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जनावरांना पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे

आधीच कोरोना रोगाची साथ आहे. त्यात "लंपी' ने जनावरांना फास आवळला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या आजाराबाबत शासनाचे पशुसंवर्धन विभाग सतर्क आहे. अनेक भागातील जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुपालकांनी जनावरांना अशी लक्षणे आढळल्यास त्वरित लगतच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके यांनी केले आहे.

जनावरांची काळजी घ्यावी
लंपी हा आजार तीन-चार दिवसांत बरा होतो. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. ज्या भागात लंपीची जास्त साथ आहे. त्या भागात फवारणी करण्यात येत आहे.
- डॉ. कन्नाके,
पशुधन विकास अधिकारी, सावली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google IIT Kharagpur: आयआयटी खरगपूरच्या एआय संशोधनासाठी गुगलकडून 50 लाख डॉलर्सचा निधी; सुंदर पिचाई यांची भावुक पोस्ट

Malegaon Sugar Factory : माळेगावची उसाला पहिली उचल ३९०० रुपये जाहीर

Latest Marathi News Live Update: नऱ्हे पोलिसांनी ८.५ तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत

MS Dhoni Brand Value: क्रिकेटमधून रिटायर, पण जाहिरातीत धोनीचाच जलवा! विराट, रोहित अन् सचिनलाही टाकले मागे

उद्या शुक्राचं स्वराशीत पुनरागमन! ५ राशींचं नशीब पालटणार; पैसा, प्रेम आणि नोकरीत मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT