file photo 
विदर्भ

आधीच कोरोनाची दहशत...आता या आजारानेही काढले डोके वर..घ्या खबरदारी

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : गेल्या 2019 च्या जानेवारी ते डिसेंबर महिन्यादरम्यान डेंगी आजाराची 79 प्रकरणे होती. यात तिघांचा मृत्यू झाला होता. यामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशात 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने येत्या काळात खबरदारी पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

डेंगी ताप प्रादुर्भाव नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय आवश्‍यक आहे. डेंगी ताप हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्टाय डासाच्या मादिच्या चाव्यामुळे होतो.

डासअळींची उत्पत्ती

या डासाची उत्पत्ती आपल्या घरी रांजन, सिमेंट टाके, इमारतीवरील टाक्‍या, घरावरील प्लास्टिक, छत घराभोवतालच्या टाकाऊ वस्तू, प्लास्टिक, बकेट, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर, इलेक्‍ट्रॉनिक कचरा कुलर फ्रीजचा स्ट्रेमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासअळींची उत्पत्ती होत असते. पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवल्यास हा डास अंडी घालून अळी व कोषानंतर डासात रूपांतर होत असते. त्यासाठी पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवू नये ही खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

डेंगीची लक्षणे अशी

डेंगी हा आजार चार प्रकारचा असून त्याची लक्षणे एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपण, भूक मंदावणे, डोळे लाल होणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढउतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे अशी आहेत.

घ्यावयाची दक्षता

डेंगी ताप टाळण्यासाठी पाणी साचू देऊ नये. घराच्या अवती-भवती साचलेले पाणी तर नाही ना, याची नियमित खातरजमा करावी. कूलरची टाकी, पक्ष्यांचे पिण्याचे भांडे, फ्रीजचा ट्रे इत्यादी ठिकाणी डासाची मादी अंडी घालतात. ताप आल्यास पॅरॉसिटामॉल घेता येते. स्वत: एस्प्रिन व ब्रुफेनचा वापर करू नये. डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

नागरिकांनी कोरड दिवस पाळावा
पावसाळा जवळ आला आहे. याच काळात डेंगीवा उद्रेक होतो. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरड दिवस पाळावा, शौचालयाच्या पाइपवर जाळ लावावा. छोटी छोटी खबरदारी घेतल्यास या आजारावर प्रतिबंध घालता येईल.
- डॉ. अजय डवले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं?

Jalgaon News : प्रेमविवाहाचा राग, तरुणाला नग्नावस्थेत खांबाला बांधून मारहाण; ५ जणांना अटक

Maharashtra News: वीज चोरी; गुन्हा आणि जीवाला धोका; भारतीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत कठोर शिक्षा

Latest Marathi News Live Update : वर्धा-नांदेड महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

SCROLL FOR NEXT