Now farmers will get all schemes benefit in just one application  
विदर्भ

शेतकऱ्यांनो खुशखबर! आता एकाच अर्जावर घेता येणार अनेक योजनांचा लाभ; महाडीबीटी पोर्टलवर सादर करता येणार अर्ज

सूरज पाटील

यवतमाळ : कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्यादृष्टीने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेती निगडित विविध बाबींसाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्‍यक आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल, संगणक, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्राच्या माध्यमातूनही अर्ज करता येणार आहे.

  • वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. 
  • ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करावा. 
  • अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा.
  • त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन

पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची आवश्‍यकता राहणार नाही. 

ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनाही पोर्टलवर अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी "सकाळ'ला दिली.

संपादन -  अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC 2027 परीक्षा कॅलेंडर जाहीर! जाणून घ्या CSE, NDA, CDS, Engineering आणि CAPF परीक्षांच्या तारखा; विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट

धोनी CSK च्या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वीच रांचीत परतला! आता IPL मध्ये खरंच खेळताना दिसणार नाही?

Viral Farmer Video : वय विसरला अन् लहान मुलासारखा पिकावरुन मारल्या उड्या! भरघोस पीक आल्यावर शेतकऱ्याचा तो आनंद पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

West Bengal : बंगालमधील मदरशांमध्येही ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक; शुभेंदू अधिकारी यांचा मोठा!

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा दिलासा, १८ वर्षे जुन्या प्रकरणात निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT