हिंदू स्मशानभूमी  
विदर्भ

हिंदू स्मशानभूमीवरचा ताण होणार कमी; अन्य ठिकाणी अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे नियोजन

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : जागाच शिल्लक नसल्याने कोरनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशानभूमीत काही काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली. शहरातील इतर ठिकाणच्या स्मशानभूमीची पाहणी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असून त्यामध्ये अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबतचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे.

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असून मृतांचे प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. त्या अनुषंगाने हिंदू स्मशानभूमीत मागील तीन दिवसांपासून रुग्णवाहिकेतून आणण्यात येणाऱ्या कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना तसेच कर्मचाऱ्यांना तीन चे चार तासापर्यंत वाट पहावी लागत आहे.

हिंदू स्मशानभुमीमध्ये 15 ओट्यांवर नॉनकोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात, मात्र कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने गॅसदाहिनीवर ताण आलेला आहे. एका शवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळपास दोन तासांचा अवधी लागतो, त्यानंतर अर्धा तास गॅसदाहिनी बंद केली जाते. त्यामुळे उर्वरित शवांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.

ही समस्या जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आता शहरातील फ्रेजपुरा, नवसारी, तसेच अन्य ठिकाणी असलेल्या स्मशानभूमींच्या पर्यायांचा विचार सुरू केला आहे. त्याठिकाणी गॅसदाहिनी लावण्याचा खर्च प्रशासनाकडून केला जाईल. तसे झाल्यास शहरातील एकमेव हिंदू स्मशानभूमीवरील ताण कमी होणार आहे.

अन्य स्मशामभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याबाबतचे नियोजन तयार करण्यात आले आहे. त्याबाबत काही सामाजिक संस्थासुद्धा पुढे आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT