file photo 
विदर्भ

अबब! बनावट कागदपत्रे तयार करून एक कोटी 20 लाखांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : बनावट कागदपत्रे तयार करून एकूण एक कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयित फरार असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
रजनीशकौर करमसिंग बेदी, जसवंतकौर करमसिंग बेदी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्था उमरसराअंतर्गत घाटंजी तालुक्‍यातील राजुरवाडी व सावरगाव मुंगी येथे किसनसिंग जितसिंग सिद्धू या नावाने सरकारमान्य अनुदानित शाळा आहे. शाळेला गणपत कन्नलवार यांनी एक एकर 20 गुंठे शेती व रोख 33 हजार रुपये दान दिले. धर्मदाय आयुक्त यांची परवानगी व कोणताही ठराव न घेता संशयितांनी शेती स्वत:च्या नावे केली. संस्थेवर 78 लाखांचे कर्ज असल्याचे खोटे कागदपत्रे तयार केलीत. शिक्षकांनी दिलेले 20 लाख शाळेच्या कामासाठी वापरले नाहीत. त्याचा कोणताही हिशेब नाही. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून संगणक खरेदीसाठी 50 हजार रुपये मिळालेत. मात्र, साहित्य खरेदी केलीच नाही. दोन्ही शाळेस मिळालेले वेतनोत्तर अनुदान 15 लाख रुपये शाळेच्या कामासाठी वापरले नाही. अशा प्रकारे एकूण एक कोटी 20 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

न्यायालयाने जामीन नाकारला
रजनिशकौर बेदी, जसवंतकौर बेदी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अपर सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने अटी व शर्ती ठेवून दोन ऑगस्टला अंतरीम जामिन तात्पुरता मंजूर केला. मात्र, संशयितांना सूचनापत्र देऊन तपासासाठी हजर झाले नाहीत. दिलेल्या पत्त्यावर ते राहत नाहीत, असे तपास अधिकारी राहुलकुमार राऊत, सहायक सरकारी अभियोक्ता यू. के. पांडे यांनी न्यायालयापुढे हजर राहून सांगितले. त्यावर अपर सत्र न्यायालयाने 31 ऑगस्टला अटकपूर्व जामीन नाकारला. सध्या फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT