coronavirus 
विदर्भ

Video : यवतमाळकरांचे टेन्शन कमी करणारी बातमी... कोरोना रुग्णांची संख्या घटली

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले 38 लोक, 14 दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या 38 पैकी 3 जणांना संस्थात्मक विलागीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित 35 जण गृह विलगीकरणात राहणार आहेत.

जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्हची संख्या 45 वरून 7 वर आली आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल या दरम्यान  पॉझिटिव्ह रुग्णांच्या  संख्येत सर्वाधिक भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता 98 वर गेला होता. यापैकी तब्बल 91 जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

सविस्तर वाचा - दीड महिन्यापासून बंद दुकाने उघडली आणि...
सुरुवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, मात्र नंतर नेर आणि उमरखेड़ (मौजा धानोरा) येथे पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड़ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व हाय रिस्क व लो रिस्क अशा 68 लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील हाय रिस्क व लो रिस्क अशा 76 जणांचे रिपोर्ट्स तपासणीसाठी पाठवले असता यापैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 73 रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
उमरखेड़, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT