Social Media
Social Media eskal
विदर्भ

आक्षेपार्ह व्हिडिओने तणाव; भाजप-सेनेच्या नेत्यांचा ठिय्या

सकाळ डिजिटल टीम

उमरखेड (जि. यवतमाळ) : येथील काही समाजकंटक तरुणांनी दुचाकीवर बसून दुसऱ्या धर्माबद्दल काही मिनिटांचा आक्षेपार्ह व्हिडिओ (Offensive video) तयार केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) टाकून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओने दुसऱ्या समाजाची धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांनी याची तक्रार उमरखेड पोलिस ठाण्यात केली. जमलेल्या तरुणांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर दुसऱ्या समाजाच्या भावना चांगल्याच दुखावल्या गेल्या. पुसद येथील आक्रोश मोर्चासाठी पोलिस गेल्यामुळे पोलिस स्टेशनसमोर जमाव वाढतच गेला. आरोपींवर कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसांनी जमावाला सांगितले. तरीही जमाव शांत झाला नाही. जमावाने जाताना सदानंद वॉर्डातील प्रेरणा केश कर्तनालय या दुकानाची तोडफोड तर नागचौकातील गणेश ऑटोमोबाईल्सची जाळपोळ तसेच रस्त्यातील गाड्यांची तोडफोड केली.

यानंतर आमदार नामदेव ससाणे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक संदीप ठाकरे, शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक टीमसह आले. त्यांनी सर्वांसोबत बैठक घेत नुकसान झालेल्यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले.

आरोपींना लवकरच अटक केली जाईल. त्यांच्यावर कोणतीही गय केली जाणार नाही, असे सांगून नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तोपर्यंत पोलिसांची कुमक शहरात येत होती. रात्री तणाव पूर्ण शांतता होती. घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेत पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. रात्रीच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील दुकाने बंद आहेत व तपास सुरू आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid-19: तो पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

Latest Marathi News Live Update: जॅकी श्रॉफचे 'सिंगम अगेन'साठी काश्मीरमध्ये शुटिंग, म्हणाला...

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

Munjya Teaser: "मुन्नी बदनाम हुई गाणं ऐकायला तो आला अन्..."; 'मुंज्या' चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलात?

SCROLL FOR NEXT