Officer in gadchiroli district cleaning Sironcha city
Officer in gadchiroli district cleaning Sironcha city  
विदर्भ

शहर स्वच्छतेसाठी थेट मुख्याधिकाऱ्यांनीच हाती घेतला झाडू; 40 कर्मचाऱ्यांसह केली स्वच्छता 

मिलिंद उमरे

सिरोंचा (जि. गडचिरोली) : शहरात दिवसेंदिवस घाण, कचरा, अस्वच्छतेचे साम्राज्य वाढत असून नागरिकांची सातत्याने ओरड होत असल्याने अस्वच्छतेविरोधातील या लढाईत हाती कुदळ, फावडे घेऊन प्रत्यक्ष नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील आपल्या 40 कर्मचाऱ्यांसह उतरले आहेत. मुख्याधिकारीच शहर स्वच्छतेच्या कामाला लागल्याने इतर अधिकारी, कर्मचारीही मन लावून स्वच्छता अभियान राबविताना दिसत आहेत.

सिरोंचा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन शहर मुख्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात तसेच प्राणहिता नदी परिसरात नगरपंचायतीच्या संपूर्ण 40 कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. 

2020-2021 माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शहरात प्रत्येक वॉर्डात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शुक्रवार (ता. 25) सकाळी शहरातील प्राणहिता नदी परिसरातील कचरा गोळा करण्याचे काम मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन केले. तसेच त्यांना सहकार्य करण्याचे काम नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केले. 

हे स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नगरपंचायतीचे अभियंता धर्मेंद्र घोडे, प्रशासकीय अधिकारी सचिन सनस, लिपिक अफसर सायद , जाहीर गोरमिया, पंप ऑपरेटर मोहसीन खान, व्यंकटेश जिटाबोईना आदींची प्रमुख उपस्थिती होती. ही मोहीम केवळ एक दिवसासाठी नसून यापुढेसुद्धा सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी सांगितले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी या नदी घाटाच्या परिसरात घरातील कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.

कुजलेली समस्या सुटली

मागील अनेक महिन्यांपासून सिरोंचा शहरात घाणीचे साम्राज्य वाढून येथील अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस कुजत चालली होती. पण, केवळ आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना आदेश देत खुर्चीवर शांतपणे बसण्याऐवजी मुख्याधिकारी विशाल पाटील स्वत:च अस्वच्छता अभियानात सक्रिय झाल्याने आता ही अस्वच्छतेची समस्या कायमची सुटणार, असा विश्‍वास नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT