officers negligence to the women and child development in nagpur zp 
विदर्भ

अधिकारी कामात व्यस्त, विभागाकडे मात्र दुर्लक्ष; बालाकांचा विकास होणार कसा?

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. दुसरीकडे पदाधिकारी, अधिकारी आपल्याच कामात व्यस्त असून विभागाकडे दुर्लक्ष करीत असल्याने बालकांचा विकास होणार कसा, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य स्थितीत सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पूरक पोषण आहार, आरोग्य व पोषण आणि अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण इत्यादी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. जिल्ह्यात जवळपास २४२३ अंगणवाडी केंद्रांतून ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता व स्तनदा माता यांना या सेवा पुरविण्यात येतात. परंतु, यानंतरही कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. 

जिल्ह्यात ९०२ कुपोषित बालके आहेत. विभागातील महत्त्वाची असलेली रिक्त पदे याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याकडे पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कंत्राट आणि बदल्यांवर त्यांचा भर असल्याची चर्चा आहे. नुकतेच एक कर्मचाऱ्याच्या बदलीचा विषय चांगलाच गाजला होता. कंत्राटावरूनही वाद झाल्याची चर्चा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येते. 

       पद मंजूर पदे रिक्त पदे
   प्रकल्प अधिकारी १३
   पर्यवेक्षिका ८७ ३१ 
   अंगणवाडी सेविका २१६१ ७३
   अंगणवाडी मदतनीस २१६१ १२८ 

   मिनी अंगणवाडी सेविका
२६४ ९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT