विदर्भ

मनोरुग्णाचे आयुष्य जगलेला गौरव करतोय एमपीएससी

केवल जीवनतारे
नागपूर : चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला. सकाळ झाली की, त्याच्या तोंडात एकच वाक्‍य..."मेल्याने बरे होईल रे...आधी मेलेच पाहिजे...'. नागपूरच्या मनोरुग्णालयात दगडी भिंतीआड "मनोरुग्ण' म्हणून आयुष्य जगताना येथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले. आत्महत्येच्या विचारांपासून त्याला परावृत्त केले. तो बरा झाला असून, आता "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' असा संकल्प उराशी बाळगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत आहे. गौरव अशोक वंजारी असे या अठ्ठाविशीतील युवकाचे नाव असून तो मूळचा वर्ध्याचा आहे.
आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील डॉक्‍टरांकडून सकारात्मक प्रयत्न "आत्महत्या प्रतिबंधक सेल'च्या माध्यमातून होत आहेत. त्यात "गौरव'च्या आयुष्याच्या डायरीतील पाने वाचली. 2006 मध्ये बारावी पास झाल्यानंतर अपेक्षांच्या ओझ्याखाली तो दबला आणि त्याचे मानसिक आरोग्य बिघडले. सावंगी मेघे रुग्णालयात उपचार केले. दरम्यान, गौरवच्या मनात प्रेमाच्या विचारांचे चक्र सुरू झाले आणि आयुष्यात "सायली' आली. बरसत्या धारांच्या साक्षीने सायलीने प्रेमाला होकारही दिला, परंतु डोक्‍यात अचानक वेदनेची कळ आली. डॉक्‍टरांना सांगितले, त्यांनी मानसिक ताण असल्याचे सांगत प्रेमापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि प्रेमिकेशी खोटे बोलून तिच्यापासून दूर होण्याचा निर्णय गौरवने घेतला. सायलीला टाळणे सुरू केल्याने तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो धक्का गौरवला बसला आणि त्याच्या मनात "मेल्याने बरे होईल रे, आधी मेलेचि पाहिजे' या विचारांचे काहूर माजले.
गळफास लावण्यापासून तर अंगावर रॉकेल ओतले, विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागपूरच्या मनोरुग्णालयात 2016 मध्ये भरती करण्यात आले. दगडी भितींच्या आड असलेले उद्‌ध्वस्त आयुष्य जगणे सुरू झाले. डॉ. आशीष कुथे, डॉ. पंकज बागडे, डॉ. अनघा सिन्हा, डॉ. अमोल चव्हाण, डॉ. दीपक अवचट, डॉ. आनंद लाडे, डॉ. अभिषेक मामर्डे, संध्या दुर्गे यांच्या उपचारातून बरा झाल्याची नोंद गौरवच्या डायरीत आहे. गौरव आता दर दिवसाला 8 तास अभ्यास करतो. अर्थशास्त्रात एम. ए. करणाऱ्या गौरवने एमपीएससीची परीक्षा पास करण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांच्या मार्गदर्शनात आत्महत्या प्रतिबंधक सेल सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT