file photo 
विदर्भ

दीड महिन्याच्या चिमुकल्याच्या नाकात गेली पीन, कुटुंबीयांची झाली धावाधाव, मग डॉक्टरांनी केला यशस्वी प्रयोग

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : दीड महिन्याच्या चिमुकल्याच्या नाकात पीन गेली. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत सापडले. वरोऱ्यातील डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार चंद्रपुरातील डॉ. मनीष मुंधडा यांचे हॉस्पिटल गाठले. चिमुकल्याची तपासणी केली. श्‍वासनलिकेत पीन अडकली होती. तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. डॉ. मुंधडा यांनी मोठी क्‍लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. आजघडीला चिमुकला ठणठणीत असून, आईच्या कुशीत आहे.

वरोरा येथील निखिल बाबूराव मडावी यांना रियांश नावाचा दीड महिन्याचा मुलगा आहे. २१ डिसेंबरला रियांशच्या नाकात पीन गेली. ती श्‍वासनलिकेत अडकल्याने त्याला श्‍वास घेताना त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे मडावी कुटुंबीय चिंतेत सापडले होते. त्यांनी तातडीने डॉ. देवतळे यांचे रुग्णालय गाठले. एक्‍स-रे केल्यानंतर पीन श्‍वासनलिकेत अडकल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ही पीन श्‍वासनलिकेतून काढण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणेही गरजेचे होते.

अन् नाकातून काढली पीन

डॉ. देवतळे यांच्या सल्ल्यानुसार चंद्रपुरातील डॉ. मनीष मुंधडा यांचे रुग्णालयात बालकाला नेण्यात आले. डॉ. मुंधडा यांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मडावी कुटुंबीयांनी चिमुकल्याच्या जीवासाठी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला. त्यानंतर डॉ. मुंधडा यांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता चिमुकल्याच्या नाकातून पीन काढून त्याला जीवनदान दिले.

आता प्रकृती ठणठणीत

या सर्व प्रक्रियेत डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. सलीम तुकडी यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर चिमुकल्याला काही दिवस डॉ. इरशाद शिवजी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. चिमुकल्याची प्रकृती आता ठणठणीत असून, रुग्णालयातून त्याला सुटी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. मनीष मुंधडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. गोपाल मुंधडा उपस्थित होते.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT