corona-agencies.jpg 
विदर्भ

Coronavirus : अकोल्यात एकाचा मृत्यू, दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मागील काही दिवसांपासून झपाट्याने आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आज बुधवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. आज एकूण 31 अहवालापैकी केवळ दोनच रुग्णांचे पॉझिटिव्ह आले असून, त्या दोन्ही महिला आहेत. 29 अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज घटलेल्या संख्येमुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी एका रुग्णाच्या मात्र मृत्यू झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयकडून मिळालेल्या माहितीनुसार आज एकूण 31 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोनच अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह पैकी दोन्ही रुग्ण ह्या महिला असून, त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत.

अशी आहे आतापर्यंतची स्थिती
पॉझिटिव्ह अहवाल 77
उपचार घेत असलेले रुग्ण 57
मृत्यू 7
आत्महत्या १
पूर्णपणे बरे झालेले 13

65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण २ मे रोजी दाखल झाला होता, ५ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण खंगनपुरा येथील रहिवासी होता.

काहीसा दिलासा धोका मात्र कायम
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोनच महिलांचे पॉझिटिव्ह अहवाल जरी आले असले तरी हा दिलासा क्षणिक असून, येत्या काही दिवसात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक आहे. तेव्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा हा काहीसा दिलासा जरी असला तरी धोका मात्र कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT