one died in road accident at pombhurna of chandrapur 
विदर्भ

वाहनासमोर सारस आले अन् घडला मृत्यूचा थरार, बापासमोरच मुलगा ठार

श्रीकांत पेशट्टीवार

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर ) :  चिंतलधाबा येथून दुचाकीने येत असलेल्या बाप- लेकांचा चिंतलधाबा मार्गावरील चेक आष्टाजवळ अपघात झाला. यात दुचाकीस्वार मुलगा ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मृताचे नाव प्रशांत कुळमेथे (वय 22) असे आहे. 

सातारा कोमटी येथील प्रशांत कुळमेथे आणि दिवाकर कुळमेथे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. काम झाल्यानंतर ते दुचाकीने स्वगावी येत होते. पोंभुर्णा-चिंतलधाबा मार्गावर त्यांच्या वाहनासमोर सारस प्राणी आला. त्यामुळे प्रशांतचे वाहनासमोरील नियंत्रण सुटले. दोघेही वाहनावरून खाली कोसळले. प्रशांत आणि दिवाकर कुळमेथे हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रशांतची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. शनिवारी (ता. 19) प्रशांत कुळमेथे याचा मृत्यू झाला. प्रशांतच्या मृत्यूने साताराकोमटी गावात शोककळा पसरली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT