One dies after drowning in Wardha district crime news 
विदर्भ

मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा इतिहास आणि घडली अनुचित घटना

गुलाबराव चिंचुलकर

कोरा (जि. वर्धा) : येथील लाल नाला धरणाच्या मुख्य गेटच्या समोरील टाक्‍यात पाय टाकून बसलेल्या भाचा पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. तर याच टाक्‍यात पोहत असलेला मामा थोडक्‍यात बचावला. ही घटना शनिवारी (ता. सहा) सायंकाळच्या सुमारास घडली. हितेश गिरी (वय १८) असे मृताचे नाव आहे. तर बादल भाटे (वय २२) असे बचावलेल्या मामाचे नाव आहे.

शनिवारी सुटी असल्याने गावातील चार मित्र दुपारी लाल नाला धरणाच्या मुख्य गेट समोरील ओव्हरफ्लोच्या टाक्‍यात पोहण्यासाठी गेले होते. थोडी मौजमजा करावी असा त्यांचा उद्देश होता. या उद्देशाने या चौघांनी चिवडा घेतला आणि लाल नाला धरणाकडे गेले. येथे चार मित्रांनी चिवडा खाल्ला. कही वेळाने यातील दोघे चिवडा खात बसले तर मामा बादल भाटे आणि भाचा हितेश गिरी हे दोघे पाण्याच्या टाक्‍यावर गेले.

मामाला थोडे पोहता येत असल्याने तो पोहत होता. तर भाचा पाण्यात पाय टाकून बसला होता. या टाक्‍यात सतत पाणी राहत असल्याने हितेश घसरून पाण्यात पडला आणि खोल पाण्यात गेला. मामाने आरडओरड केली आणि तो भाच्याला वाचविण्यासाठी गेला.

यात मामाही गटांगळ्या खाऊ लागला. बाहेर असलेल्या दोघांनी गावातील नागरिकांना बोलाविले आणि या दोघांना बाहेर काढून रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्‍टरांनी तपासाअंती हितेश गिरी याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : जरांगे मुंबईत दाखल, आझाद मैदानात हजारो आंदोलक; मोठा पोलीस बंदोबस्त, वाहतूक मंदावली

PV Sindhu: दमदार विजयासह सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, दुसऱ्या क्रमांकावरील चीनच्या वँगला नमवले

Baby Health Care: १ वर्षाखालील बाळांनाही होऊ शकतो डिहायड्रेशन! जाणून घ्या लक्षणे आणि काळजी कशी घ्यावी

Rainbow Modak Recipe: मोरेश्वरासाठी तिसऱ्या दिवशी भक्तीमय वातावरणात बनवा रंगीत 'इंद्रधनुष्य मोदक', जाणून घ्या रेसिपी

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांना हसन मुश्रीफांचे आवाहन, गोकुळ दूध संघाच्या कारभारावर एकमेकांवर टीका; तर..'महायुतीमध्ये मिठाचा खडा'

SCROLL FOR NEXT