one injured in accident in talegaon of wardha 
विदर्भ

वीज झाडावर पडताच झाड कोसळून दुचाकीवर पडले अन् घडला थरार

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव (श्‍यामजीपंत)(जि.वर्धा) : लगतच्या खडकी शिवारात भारसवाडा ते खडकी रस्त्यावरील मुंजेबाबा मंदिराजवळ बाभूळ झाडावर अचानक वीज कोसळली. यात झाड तुटले आणि ते रस्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर पडले. यात दुचाकीवर मागे बसून असलेला व्यक्‍ती गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. 17) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. 

हवामान खात्याने वर्ध्यात आज विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला होता. यानुसार सकाळी आष्टी तालुक्‍यात विजांचा कडकडाट झाला. याच काळात खडकी ते तळेगाव मार्गावरील मुंजेबाबा मंदिराजवळील बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. वीज कोसळताच हे रस्त्यावर पडले. या झाडाखाली रस्त्याने जाणारी दुचाकी आली. यात चालक मुरलिधर मुंदाने (वय 42) रा. अंतोरा, तर सोबत असलेले पुरुषोत्तम बाळस्कर रा. ममदापूर हे दोघे जखमी झाले. यात मागे बसून असलेल्या पुरुषोत्तम बाळस्कर याचे दोन्ही पाय निकामी झाले. यावेळी खडकी येथील सुरेंद्र नागपुरे यांना घटनास्थळी पडून दिसताच गावाकडे धाव घेत नागरिकांना घेवून घटनास्थळ गाठले. त्यांना झाडाखालून काढले. त्यांना आर्वी येथील रुग्णालयात रवाना केले. मुरलीधर मुंदाने यांचे वेल्डींगचे दुकान आहे. त्यांच्यासोबत असलेले पुरुषोत्तम बाळस्कर हे त्यांच्याकडे मजुरीचे काम करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT