corona 
विदर्भ

अमरावतीत आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू! बाधितांची संख्या 256 वर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : कोरोनाचे वादळ थांबता थांबत नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वप्रकारची काळजी घेऊनही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता तर जनजीवन थोडेफार रुळावर येत आहे. नागरिकांनी आपापले नोकरी व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच कोरानाचा धोका आणखी वाढतो की काय? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
स्थानिक हबिबनगर येथील 54 वर्षीय व्यक्ती 24 मे रोजी कोविड रुग्णालयात दाखल झाली होती. त्या व्यक्‍तीचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला. त्याची पुष्टी जिल्हा प्रशासनाने नुकतीच केली. जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 16 व्यक्ती मरण पावल्या आहेत.

सविस्तर वाचा - नागपुरात नगरसेवक घरीच विलगीकरणात
या सोबतच बुधवारी (ता.3) शहरात आणखी सात कोरोनाबाधित आढळून आले. यशोदानगर परिसरातील 23 वर्षीय महिला, वडरपुरा येथील 25 वर्षीय पुरुष, रुक्‍मिणीनगरातील 22 वर्षीय महिला, मसानगंज येथील 41 वर्षीय महिला, तर बडनेरा येथील 31 व 32 वर्षीय पुरुष व अलीमनगर येथील एका 60 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या आता 256 झाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Life-Saving Injection 9 Crore Case: अनिकाच्या उपचारांसाठी ९ कोटींच्या इंजेक्शनची गरज, हायकोर्टाने गुजरात सरकारवर ओढले ताशेरे; 'चिमुकली लाडकी बहीण नाही का?'

Why Lionel Messi Cried? लिओनेल मेस्सी त्यादिवशी का रडला? कुटुंबियांनी सांगितली अर्जेंटियन स्टारच्या मनातली भीती, वडिलांना...

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

SCROLL FOR NEXT