sexual harashment 
विदर्भ

एकीला केले गर्भवती; दुसरीला दिले लग्नाचे आमिष 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : जिल्ह्यातील आसेगाव व नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीसह एका युवतीवर लैंगिक अत्याचार झाला. त्यापैकी अल्पवयीन मुलगी ही गर्भवती आहे, तर दुसऱ्या युवतीला कथित प्रियकराने लग्नाचे आमिष दाखविल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. 

आसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात राहणारा 26 वर्षीय युवक सोपान अवघड याने अल्पवयीन मुलीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर घटनेची वाच्यता करू नये म्हणून जिवाने मारण्यासह बदनामी करण्याची धमकी सुद्धा दिली. या घटनेबाबत आरोपीविरोधात पीडितेने आसेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सोपान अवघडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोमवारी (ता.22) त्याला न्यायालयासमोर हजर केले, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे कळते. 

दुसरी घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्‍यातील एका गावात घडली. चार ते पाच महिन्यांपूर्वी अमरावती येथील प्रशिक वानखडे या 23 वर्षीय युवकाने पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर एका शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेने आरोपी प्रशिकला लग्नाची गळ घातली असता प्रशिकने लग्न करण्यास नकार दिला. आरोपीने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपी प्रशिकवर संबंधित आरोप केले.नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी प्रशिकविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT