sim-card 
विदर्भ

मित्राच्या सीमकार्डचा असाही उपयोग, वाचा नेमके काय झाले?

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल फोन आला आहे. या मोबाईलचा कोण कसा उपयोग करेल हे त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. विकृत मनोवृत्तीची माणसे या तंत्रज्ञानाचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी करतात. त्यामुळे सायबर क्राईमलाही उत आला आहे. मात्र चक्‍क आपल्या अंध मित्रालाचा दगा देऊन त्याच्या सीमकार्डचा उपयोग वाईट कामासाठी करून त्याला बदनाम करणाऱ्या बहाद्दराला नुकतीच अटक करण्यात आली आहे.
शहरात एकाच खोलीत रुमपार्टनर म्हणून राहणाऱ्या दोन मित्रांपैकी अंध मित्राने दुसऱ्या मित्राला स्वत:चे सीमकार्ड वापरायला दिले, त्या सीमकार्डवरून आरोपीने एका महाविद्यालयीन युवतीस अश्‍लिल मेसेज पाठविले. मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी (ता. 12) एकास मोझरी येथून अटक केली आहे. मंगेश बाळू वानखडे (वय 25 रा. मोझरी) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा - आरोपी विकेश म्हणाला, मला गोळ्या झाडून मारा...
मंगेश वानखडे व त्याचा दिव्यांग मित्र हे दोघे शहरातील महाविद्यालयात शिकत होते. दोघेही एका भाड्याच्या खोलीत रुमपार्टनर म्हणून राहत होते. चार महिन्यांपूर्वी गाडगेनगर परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एका अनोळखी मोबाईल क्रमांकाहून अश्‍लील मेसेज येत होते. तिच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासणी अंती ज्या क्रमांकावरून युवतीला मेसेज जात होते. त्या सीमकार्ड धारकास गाडगेनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते सीमकार्ड एका अंध व्यक्‍तीच्या नावे होते. व्यक्तीची चौकशी केली असता, त्याने त्याचे सिमकार्ड वापरण्यासाठी वानखडे या मित्राला दिल्याचे आणि त्या युवतीला आपण ओळखत नसल्याचे दिव्यांगाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिव्यांगाच्या माहितीवरून पसार मंगेश वानखडे याला अटक केली. पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक होळगे, बबलु येवतीकर, नरेंद्र ढोबळे, जहीर खान यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT