विदर्भ

चोरांचा कांद्यावर डोळा; कांदाचाळीतून अडीच लाखांचा कांदा चोरी

राहुल मंगळे

नेरपिंगळाई (जि. अमरावती) : सोन्याचे दागदागिने, रक्कम चोरीच्या घटना नेहमीच ऐकण्यात येतात. परंतु, आता चोरांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कांद्याच्या अडीच लाख रुपये किमतीच्या गोण्याच चोरण्याचा प्रकार मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई शेतशिवारात २७ जुलैच्या रात्री घडली. (Onion-theft-Panic-among-farmers-Amravati-Crime-News-nad86)

नेरपिंगळाई येथील कांदा व्यापारी अब्दुल हकीम अब्दुल रहीम व शेख मुर्तुझा गुलाम हुसेन यांनी धानोरा येथील रमाकांत यावले यांची कांदाचाळ भाड्याने घेऊन कांद्याची साठवणूक केली होती. या कांदाचाळीची ग्रील वाकवून चोरट्यांनी २२० गोणी कांदा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना अडीच लाखांचे नुकसान झाले.

शेतात मध्यरात्री रखवालदार नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला लक्ष्य करीत चोरी केली. काही दिवसांपासून बाजारामध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटल झालेत. कांद्याची मागणी वाढत असल्यामुळे हे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतातील कांदाचाळीत साठवला आहे. या चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास शिरखेडचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या नेतृत्वात बीट जमादार श्यामसिंग चुंगडा, मनोज टप्पे, किरण बांबल, नीलेश देशमुख, रामेश्वर इंगोले, अनुप मानकर करीत आहेत.

(Onion-theft-Panic-among-farmers-Amravati-Crime-News-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT