corona virus 
विदर्भ

या जिल्ह्यात होणार संशयितांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन, नंतर घेणार थ्रोब स्वॅब

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कोरोनाच्या संशयितांचे नमुने घेण्यासाठी आता प्रथम त्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचा ओटीपी जनरेट झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या घश्‍यातील स्त्रावाचे नमुने घेतले जाणार आहे. यादृष्टीने शहरात उभारण्यात आलेल्या अस्थायी कोविड ओपीडीमध्ये नव्याने व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

स्थानिक हाथीपुरा, हैदरपुरा, कमेला ग्राऊंड, नुराणी चौक, पाटीपुरा, तारखेडा, हनुमाननगर, खोलापुरीगेट, ताजनगर इत्यादी भागात कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिक स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत नसल्याने त्यांच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे नागपुरीगेट परिसरात कोविड ओपीडीमध्ये स्वॅब घेण्यास सुरुवात केली होती. मात्र तीन-चार दिवसांपासून ही ओपीडी सुरू असली तरी त्या ठिकाणी स्वॅब घेतले जात नाही. ओपीडीमधील खबरदारीविषयक आवश्‍यक सामग्री संपली की काय, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.

कोविड ओपीडीमध्ये नव्याने व्यवस्था उभारणार
यासंदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे विचारणा केली असता इंडियन मेडिकल कौन्सिल व रिसर्चच्या निकषानुसार संशयित व्यक्तीचा नमुना घेताना त्याची ऑनलाइन नोंदणी करावी लागते. ही नोंदणी केल्यानंतर त्याचा ओटीपी जनरेट केला जातो. तो जनरेट झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जातो. हीच नमुने घेण्याची योग्य पद्धत आहे. जिल्हा प्रशासनाने महापालिका क्षेत्रात सुरू केलेल्या फिवर क्विनिक, कोविड ओपीडमध्ये संगणकीय व्यवस्था उभी करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत असल्याने तूर्त या केंद्रांमध्ये स्वॅब घेणे बंद आहे. व्यवस्था निर्माण होताच केंद्र पूर्ववत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT