only nine well construction complete in saoli of chandrapur  
विदर्भ

धडक सिंचन विहिरींचे अनुदान रखडले, १०८ पैकी फक्त नऊ विहिरींची कामे पूर्ण

सुधाकर दुधे

सावली (जि. चंद्रपूर ) :  कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था डगमगली. अनेक लोकोपयोगी योजनांवर संक्रात आली. धडक सिंचन विहीर योजनेलाही त्याचा फटका बसला. अनेक लाभार्थ्यांना विहीर बांधकामाचे अनुदान मिळाले नाही. 2019- 20 या सत्रात तालुक्‍यात 108 विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यातील केवळ नऊ विहिरींची कामे पूर्ण झाली. 99 विहिरींची कामे अनुदानाअभावी रखडली आहेत. 

लॉकडाउन लागल्यामुळे अर्थव्यवस्था डगमगली. अनेक शासकीय योजनांना त्याचा फटका बसला. महत्त्वाकांक्षी ठरणारी धडक सिंचन विहीर योजनानाही यातून सुटली नाही. अनुदान रखडल्याने तालुक्‍यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबविते. या योजनांना जलदगतीने अनुदान राशी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरविले. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. लॉकडाउन लागल्यामुळे सरकारी अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. शासन स्तरावर अनेक योजनांना तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. असे असले तरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी धडक सिंचन योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

शासनामार्फत या योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना देण्याची योजना आहे. सावली तालुका परिसरात धडक सिंचन योजनेअंतर्गत सन 2019 - 20 मध्ये 108 विहिरींना मंजुरी देण्यात आली. यातील फक्त नऊ विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले. 99 विहिरीचे बांधकाम अनुदानाअभावी राखले आहे. सावली तालुक्‍यात शासनाने 108 विहिरीसाठी 2 कोटी 70 लाख रुपये मंजूर केले. त्यातील 23 लाख रुपये प्राप्त झाले. यातून केवळ नऊ विहिरीचे बांधकाम करता आले. उर्वरित विहिरीच्या बांधकामाचा निधी रखडला. निधीअभावी शासनाने अद्यापपर्यंत बांधकाम सुरू  करण्याचे पत्र शेतकऱ्यांना दिले नाही. दरम्यान, धडक सिंचन विहिरींचे अनुदान तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT