file photo
file photo 
विदर्भ

एका चक्रीवादळाने संत्रा झाला मातीमोल, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वादळी पावसाने शनिवारी (ता. १९) तालुक्‍यात उग्ररूप धारण केले. तालुक्‍यातील आमला, जळका, सालोरा या गावात व शेतशिवारात सोयाबीन तसेच इतर पिकांसह संत्र्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी या भागात भेट देऊन परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

शनिवारी (ता. १९) सायंकाळी तालुक्‍यात चक्रीवादळासह पाऊस झाला, त्यात तालुक्‍यातील संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमला परिसरातील जळका, सालोरा या भागात प्रचंड नुकसान झाले. अगदी तोडीला आलेल्या संत्राफळांचा अनेक शेतात सडा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या चक्रीवादळाने हिरावून घेतला.

याची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शेतशिवारात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत भेट दिली आणि त्यांना लवकरच या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे सांगितले. या वेळी नुकसानग्रस्त शेतकरी उमेश केणे, गोपाल बकाले, सुधीर डेरे, राजेंद्र डेरे, संजय केने, रूपेश पोलाड, गणेश वासनकर, सुनील केने, दिलीप होले, प्रशांत घाटोळ, प्रशांत बकाले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

अर्ध्याअधिक संत्राफळांचे नुकसान
तालुक्‍यात गेल्या आठवड्याभरापासून रोज वादळी पाऊस सुरू आहे. त्यात नियमित असलेले मूग, उडीद, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान होत आहे. तर शनिवारी आलेल्या वादळामुळे संत्रा उत्पादकांचे कंबरडेच मोडले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या संत्र्याचा व्यापाऱ्यांशी सौदाही केला होता. परंतु त्यातील अर्ध्याअधिक संत्राफळांचे नुकसान झाले.
- उमेश केने, शेतकरी.


तलाठ्यांनी केले पंचनामे
शनिवारी तालुक्‍यात मोठे वादळ आले. त्यात तालुक्‍यातील काही भागांतील शेतमालाचे नुकसान झाले. रविवारी (ता. 20) सकाळी तलाठी यांना पंचनाम्यासाठी पाठविले. त्यावेळी नुकसान असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.
-राजेंद्र इंगळे, तहसीलदार.

(संपादन :  दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT