sanjay rathod.jpg 
विदर्भ

तर घ्यावा लागेल कठोर निर्णय...संजय राठोड यांचा सज्जड दम

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरात कोरोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या ही चिंतेची बाब आहे. एकाच प्रतिबंधित भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग इतरत्र होऊ नये, यासाठी आणखी कडक निर्णय घेणे काळाची गरज आहे. जिल्हा प्रशासन त्याप्रमाणे निर्णय घेत आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी (ता. 27) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नागपूरनंतर जिल्ह्यातून सर्वाधिक नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रशासन सर्व गोष्टींची अतिशय गांभीर्याने दखल घेत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्‍यांत कोरोनाचा संसर्ग नाही. यवतमाळ तालुक्‍यातील ग्रामीण भागातही संसर्ग नाही. शहरात दिल्ली "कनेक्‍शन'चे लोक इतरत्र फिरल्याने संसर्ग वाढला आहे. जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी शासन-प्रशासन नियोजनबद्ध काम करीत आहे, असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

विनाकारण गर्दी करू नये

नागरिकांना अत्यावश्‍यक वस्तू आणण्यासाठी सुविधा दिली तर त्याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. विनाकारण लोक गर्दी करीत असून बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे आणखी कडक निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नागरिकांना असुविधा होईल, मात्र आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले.

जिल्ह्यात 89 फिवर क्‍लिनिक सुरू

जिल्ह्यात आतापर्यंत 89 फिवर क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहेत. यात 65 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 14 ग्रामीण रुग्णालय आणि प्रतिबंधित क्षेत्रातील 10 क्‍लिनिकचा समावेश आहे. या फिवर क्‍लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकला, सारी, अंग दुखणे, श्‍वसनाचा त्रास आदींची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील नागरिकांना यापैकी काही लक्षणे असल्यास त्यांनी नजीकच्या फिवर क्‍लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, कोरोना समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.


अधिष्ठातांची चुप्पी

वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात सुविधांची वाणवा असल्याचा प्रश्‍न पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. एकूण प्रश्‍नांची सरबत्ती होत असल्याचे बघून अधिष्ठातांनी चुप्पी साधली. पालकमंत्री संजय राठोड यांनी उत्तर देण्यास सांगितले. मात्र, अधिष्ठाता डॉ. सिंह कुणाचेही समाधान करू शकले नाहीत. डॉ. मिलिंद कांबळे यांनी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MI vs RCB ची तिकीटं मिनिटात विकली गेली... १ लाख रुपयांपर्यंत किंमत...फॅन्स म्हणतात, काहीतरी झोल आहे...

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

SCROLL FOR NEXT