over 1 lac people did not pay electricity bills in yavatmal  
विदर्भ

बापरे! यवतमाळ जिल्ह्यात तब्बल एक लाख ग्राहक थकबाकीदार; एप्रिलनंतर एकही बिल भरलं नाही

चेतन देशमुख

यवतमाळ: जिल्ह्यातील तब्बल एक लाख ग्राहकांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून एकही वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे तब्बल 95 कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, या थकबाकीमुळे वीज महावितरण कंपनी आर्थिक अडचणी आली असून, ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

लॉकडाउनमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वीज महावितरण कंपनीने गेल्या एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या काळात वीज बिल भरण्याचा कुठलाच तगादा लावला नाही. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारितील एक लाख ग्राहकांनी एप्रिल 2020नंतर एकदाही वीजबिल भरलेले नाही. 

खासगी वीज कंपन्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा माहे ऑक्‍टोबर 2020पासूनच खंडित करीत आहेत. महावितरणकडून मात्र, माहे फेब्रुवारी 2021पासून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मागील दहा महिन्यांत वाढलेली थकबाकीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील एक लाख 17 हजार 272 ग्राहकांकडे सध्या 95 कोटी रुपयांचे वीज देयके थकीत आहेत. त्यामुळे ती वसूल करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी थकीत रक्कम भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT