Owners of Poultry Farms have to throw birds in Pit in Yavatmal
Owners of Poultry Farms have to throw birds in Pit in Yavatmal  
विदर्भ

मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

सूरज पाटील

यवतमाळ : परराज्यांत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातही कुक्कुट पक्षांसह कावळे, मोरांचा मृत्यू झाला. "बर्ड फ्लू'ची एंट्री झाल्याची भीती जनमाणसांत पसरली आहे. "बर्ड फ्लू'ने पोल्ट्री उद्योगाभोवतीचे संकट अधिकच गडद झालेले दिसून येत आहे. चिकनचे भावही गडगडले आहेत. कोरोना काळातून व्यावसायिक सावरत नाहीत, तोच वर्षभरात हा आता दुसरा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसलेला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातही पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्ष्यांसह मोर व कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. पांढरकवडा तालुक्‍यातील लिंगटी येथे कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने सदर गाव ऍलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. येथील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. नोकरी नसल्याने बॅंकांकडून कर्ज काढून सुशिक्षित तरुणांनीही हा व्यवसाय थाटला आहे. मात्र, या व्यवसायावर "बर्ड फ्लू'चे संकट नेहमीच घोंघावत राहते. 

गेल्या वर्षी कोरोना काळातच बर्ड फ्ल्यूची आवई उठली होती. होळीचा सीझन कॅश करण्यासाठी व्यावसायिकांनी फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात बॅचेस टाकलेल्या होत्या. त्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च करून पक्ष्यांचे वजन वाढविले. विक्रीची वेळ येताच कोरोना व बर्ड फ्ल्यूमुळे कुक्कुट पक्ष्यांना खड्डे करून जमिनीत पुरण्याची वेळ आलेली होती. कुक्कुट व्यावसायिकांनी शासनाकडे आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली होती. मात्र, कुणाच्याही हातात मदत पडली नाही. 

लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच कर्ज काढून व्यावसायिकांनी बॅचेस टाकून तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला. एक, दोन बॅचेस विक्रीसाठी निघत नाहीत, तोच पुन्हा बर्ड फ्ल्यूचे संकट उभे ठाकले आहे. नागरिकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरविली आहे. दोनशे रुपये प्रतिकिलो ठोकचे भाव 160 रुपयांवर गडगडले आहेत. तर, चिल्लर विक्रीतील 240 रुपयांचे भाव 160 ते 240 रुपयांवर आलेले आहेत. आगामी काही दिवसांत पुन्हा चिकनचे भाव कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोट्यवधींचा फटका

यवतमाळ जिल्ह्यात लहान-मोठे असे सर्व मिळून चारशेच्या घरात पोल्टी फार्म आहेत. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी व्यावसायिकांनी बर्डस टाकले. मात्र, हातात काही रक्कम पडण्यापूर्वीच बर्ड फ्ल्यूमुळे विक्री योग्य झालेले पक्षी फार्ममध्येच आहेत. भाव कमी होत आहेत. नागरिकांनीही चिकनकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.

पांढरकवडा तालुक्‍यातील लिंगटी येथील मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. येत्या सोमवारपर्यंत अहवाल येऊ शकतो. सध्या तरी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला, असे म्हणता येणार नाही. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये.
-डॉ. राजीव खेरडे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.

संपादन  - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT