amravati passengers
amravati passengers 
विदर्भ

जनता कर्फ्यूत ४० प्रवासी पोहोचले अमरावतीत... मग जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे...

सकाळवृत्तसेवा

अमरावती : संपूर्ण देशात जनता कर्फ्यू असताना अमरावतीत मात्र वेगळीच घटना घडली. येथील मॉडेल रेल्वे स्थानक परिसरात अंबा एक्सप्रेसचे आगमन झाले. यातून काही प्रवासी उतरल्यामुळे एकच खळबळ उडाली. या सर्व प्रवाशांना जिल्ह्यातील ग्रामीण भागात जायचे होते. मात्र तेथे एकही वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांची कोंडी झाली. 

दरम्यान, शहरातील प्रसार माध्यमांचे काही प्रतिनिधी रेल्वेस्थानक परिसरात गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. गावी जाण्यासाठी अडकलेल्या व्यक्तीची सोय व्हावी म्हणून संबंधित प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत मध्यवर्ती बस्थानकाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. जवळपास ३५ ते ४० प्रवाशांसाठी बस्थानकात असलेल्या एसटीला मॉडेल रेल्वे स्थानकात पाठविले. विशेष म्हणजे, खबरदारीची उपाय म्हणून गावी नेवून सोडण्यापूर्वी सर्व प्रवाशांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

अमरावतीत जनता कर्फ्यू कडकडीत
कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी रविवारी घोषित करण्यात आलेला जनता कर्फ्यू कडकडीत असल्याने अमरावतीच्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. रेल्वे स्टेशनवर सकाळी आलेल्या काही गाड्यांमध्ये सुद्धा अतिशय तुरळक प्रवासी होते. तर बसस्थानक बंदच होते. स्वच्छतेच्या दृष्टीने बसस्थानक प्रशासनाने चांगला फायदा करून घेत संपूर्ण स्थानक धुवून काढले. जंतूंचा संसर्ग होऊ नये यासाठी फिनाईल तसेच फवारणी सुद्धा करण्यात आली. शहरातील सर्वच मुख्य चौकात प्रचंड शुकशुकाट होता.

शाब्बास नागपूरकर, तुम्ही करून दाखवलं... शहरात १०० टक्के जनता कर्फ्यू

एकही दुकान सुरू नव्हते. ऑटोरिक्षा, बसेस, टॅक्सी, दुचाकी गाड्या यापैकी कोणतेही वाहन रस्त्यावर नव्हते. गाडी पंक्चर झाली तरी पंक्चर जोडणारा सुद्धा रस्त्यावर नव्हता. एरवी गजबजलेले इतवारा बाजार तसेच भाजीबाजारात सुद्धा शुकशुकाट होता. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील असे सांगण्यात आले होते. परंतु, खबरदारीची उपाययोजना म्हणून व्यावसयिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT