patients beat doctor after patient dead in hinganghat of wardha 
विदर्भ

डॉक्टरांनी रुग्णाला केले मृत घोषित, नातेवाईकांना माहिती होताच डॉक्टरांना केली मारहाण

मंगेश वाणीकर

हिंगणघाट(जि. वर्धा) : शहरातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी एका खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात सदर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास १४ एप्रिलपासून आयएमएच्यावतीने बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

स्थानिक  निशानपुरा वार्ड येथील एका कोरोनाबाधित रुग्णास दुपारी स्थानिक कोठारी हॉस्पिटल येथे उपचारार्थ आणण्यात आले. यावेळी रुग्ण दगावला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या मृतकाचे नातेवाईकाने डॉ. निर्मेश कोठारी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी आरोपीस अटक करीत योग्य कारवाई न केल्यास खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्णसेवा बंद करण्याची चेतावणी पोलिस प्रशासनास दिली आहे.

वृत लिहिस्तोवर रात्री नऊ वाजेपर्यंत हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे आयएमएचे सचिव राहुल मरोठी यांच्यासह सगळे डॉक्टर तसेच प्रतिष्ठीतांची मोठी गर्दी हिंगणघाट पोलिस स्टेशनला जमा झालेली दिसली. तसेच पोलिस कारवाई सुरुच होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर दानचोरी : आरोपींकडे लाखोंची रोकड अन् अमेरिकन डॉलर; मोजणी कक्षातून टॉयलेटमध्ये लपवत होते पैसे, तिथून...

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

'तू शोमध्ये आलासच का?' कंगनाने घेतली राम कपूरची शाळा, लॉकअप २ चा Viral Video

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT