Patients lives in danger with doctors in Melghat amravati news 
विदर्भ

२०१० पूर्वीचीच वाहने डॉक्‍टरांच्या दिमतीला; मेळघाटातील डॉक्‍टरांसह रुग्णांचा जीव धोक्‍यात

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडेतत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तीन-चार वर्षांपासून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली वाहने टेंडर प्रक्रियेअभावी तीच वापरली जात आहेत. त्यातील बहुतांश वाहने खिळखिळी झाल्याने रुग्णांसह डॉक्‍टरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्यासाठी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तत्काळ नवीन वाहनासाठी टेंडरप्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मेळघाटातील दुर्गम भागात जेथे उपचार करण्यासाठी दळणवळणाची साधने सहज उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणच्या गर्भवतींना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक जिकरीचे होते.

याची दखल घेऊन आरोग्य विभागाने २५ जून १९९५ ला नवसंजीवनी योजनेंतर्गत भरारी पथकाची स्थापना केली होती. त्या योजनेंतर्गत डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच त्यांच्यासाठी खासगी भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून दिली. यामध्ये मेळघाटात २२ डॉक्‍टरांसाठी २२ खासगी वाहने दिली आहेत.

या वाहनांसाठी नियमाप्रमाणे दरवर्षी टेंडरप्रक्रिया राबवावी लागते. मात्र, तीन-चार वर्षांपासून टेंडरप्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने २०१० पूर्वीचीच वाहने डॉक्‍टरांच्या दिमतीला आहेत. यातील बहुतेक वाहने खिळखिळी झाल्याने रुग्णांसह डॉक्‍टरांचा जीव धोक्‍यात आला आहे.

एखाद्या वेळेस काही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष दिल्यास होणाऱ्या अनुचित घटनेला पायबंद बसू शकतो, अन्यथा या खिळखिळ्या वाहनांमुळे एखादी मोठी घटना घडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देत तत्काळ नव्याने टेंडरप्रक्रिया राबविण्याची मागणी केली जात आहे.

टेंडरप्रक्रिया राबविण्यात येईल
मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे टेंडरप्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. मात्र, येत्या महिन्यात टेंडरप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 
- सुभाष पाटील,
वाहन विभाग, आरोग्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

SCROLL FOR NEXT