Patroling will increase on district border because wine shops are open 
विदर्भ

मद्यविक्रीला झाली सुरुवात, सीमांवरील गस्त वाढणार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मध्यप्रदेशची आंतरराज्यीय, जिल्ह्याची आणि तालुक्‍याच्या सीमेवरील तपासणी आणखी कडक केली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारपासून (ता.8) मद्यविक्री सुरू झालेली आहे. तब्बल 46 दिवसांनंतर मद्यविक्री सुरू झाली असल्याने मद्यपींची त्याठिकाणी गर्दी होण्याची शक्‍यता तसेच मद्य खरेदीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्याच्या सीमा ओलांडल्या जाण्याची शक्‍यता असल्याने सीमेवरील तपासणी आणखी कडक केली जाणार आहे. 

तालुका आणि जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या सीमेवर अत्यावश्‍यक सेवा वैद्यकीय सेवा तसेच कृषी मालाची ने-आण करण्यासाठी खुल्या राहतील. त्या व्यतिरिक्त इतर कुणाला पासेस शिवाय ये- जा करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. अमरावती शहरात महापालिकेतर्फे आस्थापना तपासणीचे व त्याठिकाणी नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही याची पाहणी सुरू आहे.

महापालिकेच्या पथकाने तब्बल 37 ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई केलेली आहे. या पद्धतीची कारवाई नगरपालिका क्षेत्रात सुद्धा केली जाणार आहे. दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ही उपाय योजना केली जात आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात आगामी कालावधीत लोकांची वर्दळ कमी करण्यासाठी होम डिलिव्हरी या संकल्पनेवर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये इलेक्‍ट्रिक वस्तू, स्वीट मार्टच्या वस्तू, भाजीपाला इत्यादी वस्तूंचा विचार केला जातो आहे.

खरीप कर्जासाठी काही शेतकऱ्यांना तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा मिळत नसल्याचे व बँका त्यासाठी अडवणूक करीत असल्याचे समोर येत आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता बँकांना ऑनलाइन सातबारा स्वीकारण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेे आहे, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात दोन ठिकाणी मजूरांअभावी कापूस खरेदी प्रभावित झाली, मात्र सद्यःस्थितीत टोकण पद्धतीने आतापर्यंत सरकारी यंत्रणेमार्फत चार लाख 65 हजार 243 क्विंटल तर खासगी व्यापाऱ्यांमार्फत एक लाख क्विंटल कापूस खरेदी झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारपासून मद्य विक्रीला सुरुवात झाली. विदेशी मद्याची 12, बिअर शॉपीची 5 तसेच देशी दारूची 93 दुकाने उघडण्यात आली. त्यापैकी विदेशी दारू व देशी दारू विक्रीला सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत तर बिअर शॉपीला सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत परवानगी देण्यात आली. जिल्ह्यात तब्बल एक महिना पुरेल इतका मद्यसाठा असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT