Pensioner leader Pension for 30 former MLAs in the district
Pensioner leader Pension for 30 former MLAs in the district 
विदर्भ

पेन्शनधारी पुढारी!; जिल्ह्यातील 30 माजी आमदारांना निवृत्तीवेतन

सागर कुटे

अकोला : शासकीय अधिकार, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन देण्यात येत असते. त्याचबरोबर आमदार, खासदार यांना सुद्घा कार्यकाळ संपल्यानंतर निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 30 माजी आमदार आणि त्यांच्या पत्नींना निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक 72 हजार तर सर्वात कमी 20 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येत आहे. यामधील बहुतांश आताही पुढारी आहे. मात्र, निवृत्ती वेतनधारी आहेत.

वृद्धापकाळात कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये याकरिता शासनातर्फे त्यांना निवृत्तीवेतन देण्यात येत असते. संबंधित अधिकारी व कर्मचारी मृत पावल्यास त्याचे निवृत्तीवेतनातील अर्धे निवृत्तीवेतन त्याच्या पत्नीस देण्यात येते. याप्रमाणे आमदार व खासदारांना सुद्घा हजारो रुपयांचे वेतन, भत्ते मिळतात. सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या अथवा न लागो मात्र एकदा आमदार झाल्यानंतर माजी आमदार म्हणून निवृत्ती वेतनही मिळते. राज्य शासनाकडून विद्यमान आमदारांना दरमहा 67 हजार रुपये पगार, महागाई भत्ता 91 हजार 120 रुपये, दूरध्वनी खर्च 8 हजार रुपये, टपाल खर्च 10 हजार रुपये, संगणक खर्च 10 हजार रुपये, स्वीय सहायक पगार 30 हजार रुपये मिळतो. याशिवाय वैद्यकीय बिलेही मिळतात.

याकरिता थेट मेडिक्लेमची सोय आहे. तसेच केंद्र शासनाकडून खासदारांना एक लाख रुपये पगार, कार्यालय खर्च 28 हजार, प्रवास खर्च 16 रुपये प्रति कि. मी., विमान भाडे 48 फेऱ्या, स्वीय सहायक पगार 30 हजार रुपये मिळते. या आमदार व खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात आला की, त्यांना निवृत्तीवेतन सुद्घा मिळते. सद्यस्थितीत 50 हजार या प्रमाणे अकोला जिल्ह्यातील 30 माजी आमदार व काही माजी आमदारांच्या पत्नींना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत आहे. याबाबतच्या सर्व नोंदी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे उपलब्ध आहेत.

निवृत्ती वेतनधारक माजी आमदार -
निवृत्ती वेतनधारक   -  रक्कम रुपये
गुलाबराव गावंडे    -   70 हजार
हरिदास भदे         -   60 हजार
किसन राऊत         -  50 हजार
बट्रेन्ड एरिट मुल्लर    - 50 हजार
सुरेश डब्लू. कानोत  -  50 हजार
जगन्नाथ ढोणे        -   50 हजार
सुधाकर गणगणे       - 72 हजार
विठ्ठल एन. पाटील   -   52 हजार
मखराम पवार       -   62 हजार
वसंतराव खोटरे      -   64 हजार
बाबासाहेब धाबेकर    - 60 हजार
डॉ. दशरथ एन. भोंडे   - 50 हजार
गजानन बी. दाळू गुरुजी - 50 हजार
एस. बी. तिडके      -   50 हजार
डी. एम. ठाकरे       -  50 हजार
अजहर हुसैन         -   72 हजार
संजय गावंडे          -    50 हजार
रामदास बोडखे      -   50 हजार

निवृत्ती वेतनाचा लाभ घेणाऱ्या माजी आमदारांच्या पत्नी -
निवृत्ती वेतनधारक पत्नी      -   रक्कम रुपये
विजयाताई वैराळे            -   25 हजार
पुष्पा मोतीराम लहाने         -   20 हजार
सरस्वती मोतीराम लहाने     -   20 हजार
कुमुदिनी वसंतराव धोत्रे      -   40 हजार
मालतीबाई मनोहर तायडे     -   40 हजार
शांताबाई आर. झनक       -   40 हजार
मनोरमा मानिकराव आपोतिकर - 40 हजार
शशीकला काशिनाथ तिडके    - 40 हजार
लक्ष्मीबाई पी. गुजराती        -  40 हजार
शोभा रामेश्वर कराळे          -  40 हजार
जयश्री गोवर्धन खोटरे         -  40 हजार
(आकडेवारी जिल्हा कोषागार कार्यालय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT