mor 
विदर्भ

वर्धेच्या करुणाश्रमात मिळते पक्ष्यांना मायेची उब, पंधरा प्रजातीच्या पक्ष्यांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : अलिकडे धावपळीच्या जीवनशैलीत माणसांना माणसांकडेच लक्ष द्यायला वेळ नाही, तिथे प्राणी-पक्षी तर दूरच राहिले. थोडक्‍यात सांगायचे तर समाजातील भूतदया कमी झाली आहे. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात खूप दिवसांनंतर लोकांना थोडा निवांत वेळ मिळाला. हा वेळ अनेकांनी आपले छंद जोपासण्यासाठी सत्कारणी लावला. या काळात लोकांचे पशुपक्षी प्रेमही बहराला आले आणि पशुपक्ष्यांसाठी कार्यरत असलेल्या पीपल फॉर ऍनिमलकडे अनेक जखमी पक्ष्यांना लोकांनी त्यांच्या जपणूकीसाठी आणून सोडले. आणि अनेक पशुपक्ष्यांचे प्राण वाचले.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांनी घरी राहून आपल्या आवडीची कामे केली. यात ज्यांना पर्यावरण रक्षणाची आवड होती अशांनी त्यांच्या नजरेस पडलेल्या पक्ष्यांना येथील पीपल फॉर ऍनिमलच्या करुणाश्रमात आणले. वर्धेकरांनी दाखविलेल्या भूतदयेमुळे 15 प्रजातींच्या पक्ष्यांना नवे आयुष्य मिळाले.

वर्ध्यात दैनंदिन कामात व्यस्त असणाऱ्यांनी फावल्या वेळेत निसर्ग संवर्धनाकडे वाटचाल करीत पशुपक्ष्यांविषयी सहानुभूती दाखविली. त्यांच्या या सहानुभूतीमुळे विविध ठिकाणावरून आलेल्या या पक्ष्यांना आधार मिळाला. घरट्यातून भरकटलेल्या पिलांना वाचवून त्यांना पुढील उपचाराकरिता करुणाश्रमात दाखल केले. यात मुख्यतः, घार, मैना, कबुतर, हरियल, यांची पिल्ले व जखमी मोर, पिंगळा, भारद्वाज, कावळा, भौरी, शृंगी घुबड, पोपट, बगळा या प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.

या पक्ष्यांसह येथे जखमी झालेले काही प्राणीही आहेत. त्यांच्यावरही येथे उपचार सुरू आहेत. भारतात जैवविविधतेमध्ये आढळणाऱ्या प्रत्येक पक्ष्याला वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण मिळाले आहे. अशा पक्ष्यांवर उपचार करून त्यांना सुस्थितीत जंगलात सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रत्येक पक्ष्याची एक कहाणी
यातील प्रत्येक पक्ष्याची एक वेगळी कहाणी आहे. कोणाला वाहनाने धडक दिली तर कोणी शिकाऱ्याच्या तावडीतून सुटलेले. कोणाचा पाय तुटलेला तर कोणाचे पंख तुटलेले. कोणी उन्हामुळे डिहायड्रेट झालेले. उन्हाच्या तडाख्यात बेघर आणि जखमी झालेल्या प्रत्येक पक्ष्याला मायेची ऊब देण्याचा येथे प्रयत्न होतो आहे.

सविस्तर वाचा - घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा गेम

खूप आनंद मिळतो
प्रत्येकच पक्ष्याची एक खाद्यशैली आहे. ती शैली जपताना वेगळाच आनंद मिळतो. यात प्रत्येक पक्ष्याचे वेगवेगळे खाद्य, पिल्लांचे खाद्य, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे.
 कौस्तुभ गावंडे,आकस्मिक सेवा प्रभारी
पीपल फॉर ऍनिमल्स "करुणाश्रम", वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT