people contribute money for WIFI in gadchiroli district  
विदर्भ

भामरागडमधील अतिदुर्गम गावात पोहोचलं अख्ख जग; कनेक्‍टिव्हिटीची समस्या अखेर सुटली

अविनाश नारनवरे

भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील अतिदुर्गम अशा लाहेरी आणि परिसरातील गावांत राहणाऱ्या नागरिकांना इंटरनेटची सोय नसल्याने जगापासून तुटून राहावे लागत होते. पण, आता येथील ग्रामस्थांनी एकत्र येत लाहेरी पोलिस स्टेशन आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या मदतीने वायफाय सुरू केल्यामुळे येथील कनेक्‍टिव्हिटीची समस्या अखेर सुटली आहे.

जागतिक आदिवासीदिनाच्या पूर्वसंध्येला लाहेरी उप पोलिस स्टेशन, केंद्रीय राखीव पोलिस दल 37 बटालियन व लाहेरी येथील ग्रामस्थांनी सामूहिक खर्चाने भामरागड ते लाहेरी अशी तार जोडणी करून अतिदुर्गम अशा आदिवासीबहुल परंतु नक्षल प्रभावित लाहेरी येथे वायफाय सुरू केले. पुढे अशी जोडणी मल्लमपोडूर येथेही करण्यात आली. त्यानंतर होडरी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमवली असून लवकरच तेही घरबसल्या जगाशी जोडले जातील. 

येथेच न थांबता उप पोलिस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांसाठी पोलिस स्टेशनमध्ये आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले. त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा लाभ झाला. 

पुढे भामरागड तहसीलदार अनमोल कांबळे व बीएलओ यांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन त्यांनी नवीन पात्र मतदारांचा शोध घेऊन त्यांना पोलिस स्टेशनला झेरॉक्‍स व पासपोर्ट साइजच्या फोटोची मोफत सेवा पुरवून तब्बल 192 अर्जांची नोंदणी केली. संबंधित बीएलओकडे हे अर्ज सुपूर्द केले. आता आणखी एक पाऊल पुढे जात आधार कार्ड आधारे ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड काढण्याबाबत मार्गदर्शन व नोंदणी अभियान 23 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत उप पोलिस स्टेशनला राबवीत सामाजिक बांधिलकी जपली. लाहेरी पोलिस स्टेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समस्या दूर केल्याबद्दल लाहेरी व परिसरातील नागरिकांनी प्रभारी अधिकारी नळेगावकर यांचे आभार मानले आहेत.

शासन आपल्या दारी...

प्रभारी अधिकारी नळेगावकर यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील गरीब व अशिक्षित नागरिकांना शासकीय दस्तऐवज सहजरित्या उपलब्ध झाले आहेत. प्रभारी अधिकारी नळेगावकर यांनी राबविलेले हे उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असून याचे अनुकरण इतर ठिकाणीही झाल्यास खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना सार्थ होऊ शकते, असे मत व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT