people doing fraud on the name of government jobs in Amravati ZP 
विदर्भ

अमरावती जिल्हा परिषदेत शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक; मोठे रॅकेट असण्याची शक्यता 

सुधीर भारती

अमरावती ः जिल्ह्यातील मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हापरिषदेत सध्या विविध विभागांत बनावट नियुक्तिपत्र देऊन युवकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एका उमेदवाराला चक्क मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी असलेले बनावट नियुक्तिपत्र देण्यात आल्याची माहिती आहे.

शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मागील काही दिवसांपासून विविध शासकीय विभागांमध्ये तसेच जिल्हापरिषदेत काही असामाजिक मंडळी सक्रिय झालेली आहे. जिल्हापरिषदेचा विस्तार मोठा असून त्याअंतर्गत जवळपास 20 ते 22 विभाग येतात. या विविध विभागांत बनावट नियुक्तिपत्र देऊन उमेदवारांची भरती केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हापरिषदेमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एका युवकाला खुल्या प्रवर्गातून आरोग्यसेवक पदावर नियुक्तीबाबतचा बनावट आदेश देण्यात आला. 

विशेष म्हणजे, या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद, अमरावती या पदनामांचा उल्लेख करून त्यावर खोटी स्वाक्षरी करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अनेकांना बनावट नियुक्तिपत्र देण्यात आले असावे, असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

या प्रकारानंतर आता पोलिस तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित युवकाला देण्यात आलेल्या नियुक्तिपत्रावर महाराष्ट्र शासनाची राजमुद्रासुद्धा अंकित करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे शासकीय आदेश असतात त्याच पद्धतीचा बनावट नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे.

जिल्हापरिषदेमधील कायमस्वरूपी किंवा कंत्राटी पदाची भरती करावयाची झाल्यास रितसर त्याची माहिती जिल्हापरिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत असते. रितसर अर्ज घेऊन परीक्षा किंवा मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येते. जिल्हापरिषदेत काही असामाजिक मंडळीकडून नियुक्ती संदर्भातील आदेश देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. नागरिकांनी याबाबतची माहिती असल्यास तत्काळ सामान्य प्रशासन विभागाला द्यावी, जेणेकरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करता येईल.
-तुकाराम टेकाडे, 
उपमुख्य कार्याकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT