people facing problems due to worst bridge in pandhari of gondia 
विदर्भ

'साहेब...वाट कसली पाहताय, आमचा जीव गेल्यावरच पूल दुरुस्ती कराल का?'

जितेंद्र चन्ने

पांढरी (जि. गोंदिया) : सीतेपार ते किसनपूर मार्गावरील खचलेल्या पुलाची 18 महिन्यांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीसाठी दुसरा पर्याय नसल्याने जीव मुठीत घेऊन येथूनच प्रवास करावा लागत आहे. परिणामी, कधीही मोठा अपघात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

मागील वर्षीच्या पावसाळ्यात या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पुराने रौद्ररूप धारण केले होते. पुलावरून कित्येक दिवस सतत पाणी वाहत होते. त्यामुळे पुराच्या वाहत्या पाण्याने पुलाचा खालचा व बाजूचा बराचसा भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत वाऱ्यासारखी पसरली होती. लोकप्रतिनिधी, मंत्री व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले होते. तडकाफडकी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पुलावर वाहतुकीसाठी 'बंद'चा फलकदेखील लावला होता. तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पूल दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाला 18 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र, सीतेपार किसनपूर मार्गावरील पुलाची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही.

स्थानिक प्रशासनाकडून 18 महिन्यांपूर्वीच यासंबंधी कागदी कारवाई पूर्ण करून तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुपूर्द करण्यात आला. परंतु, कामचुकारपणामुळे अजूनही पूल दुरुस्ती होऊ शकली नाही.  

सीतेपार ही गटग्रामपंचायत असून, किसनपूर व शिकारीटोला ही गावे समाविष्ट आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार 1121 इतकी लोकसंख्या आहे. हा पूल तीन गावांना जोडणारा एकमात्र असून, शेतकरी, विद्यार्थ्यांपासून तर नागरिकांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

साहेब, वाट कसली पाहता? -
18 महिन्यांपासून पुलाची दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे. 12 लाख रुपयांचा निधी मंजूर असूनसुद्धा एखादा अपघात किंवा घटना घडल्यावर साहेबांना जाग येईल काय? पूल दुरुस्तीसाठी कसली वाट बघताय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT