विदर्भ

अपार्टमेंटमध्ये चालू होता देहविक्रीचा व्यवसाय; संतप्त नागरिक धडकले पोलिस ठाण्यावर

संतोष ताकपिरे

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये देहविक्रीचा छुपा व्यवसाय सुरू असल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी (Amravati Police) कारवाई केली. शनिवारी (ता. आठ) परिसरातील संतप्त नागरिकांनी दुपारी फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली. (people in Amravati goes to police station against illegal works)

एका व्यक्तीच्या मालकीचा हा फ्लॅट असून, काही दिवसांपासून बरेच आंबट शौकीन आणि काही युवती, महिलांची येथे बऱ्यापैकी रेलचेल वाढली होती. दिवसभर आणि सायंकाळी फ्लॅटमध्ये बऱ्यापैकी गर्दी व्हायची. सदर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना येथे सुरू असलेल्या प्रकाराचा मानसिक त्रास सुरू झाला. त्यामुळे येथील नागरिकांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.

पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, महिला कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी (ता. सात) रात्री सदर अपार्टमेंटमध्ये तपासणीकरिता दाखल झाले. ज्या फ्लॅटमध्ये आंबट शौकिनांची रेलचेल सुरू असल्याचा आरोप स्थानिकांना केला होता, त्या फ्लॅटमध्ये चौकशी केली असता एक महिला आणि दोन युवती आढळल्या. त्यांना पोलिसांनी फ्रेजरपुरा ठाण्यात बोलावून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा कुणताही पुरुष तेथे आढळला नाही. ज्या युवकाच्या मालकीचा हा फ्लॅट असल्याची माहिती पुढे आली, त्याचाही शनिवारपर्यंत (ता. आठ) काहीच थांगपत्ता लागला नाही.

स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली तेव्हा तेथे महिलांव्यतिरिक्त कुणीच पुरुष आढळला नाही. पसार फ्लॅट मालकाची त्यात चौकशी होईल.
-पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.

(people in Amravati goes to police station against illegal works)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT