Dirty water 
विदर्भ

आश्‍चर्य आहे! "त्या' गावातील नळातून येतो चहासारखा द्रव! 

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गावर असलेल्या लांझेडा परिसरात मागील काही दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्या पाण्याकडे पाहून जणू नळातून चहाचाच पुरवठा होत आहे की काय, असे वाटते. इतके गढूळ पाणी लांझेडातील नागरिकांना प्यावे लागते. जनावरेसुद्धा इतके खराब पाणी पित नाही. या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

गडचिरोली मुख्य शहरालाच लागून लांझेडा परिसर असून हा परिसर गडचिरोली नगर परिषदेच्याच हद्दीत येतो. तरीही येथे अनेक नागरी सुविधांची कमतरता आहे. नगर परिषदेने येथे नळांची व्यवस्था केली असली, तरी मागील काही दिवसांपासून येथे तपकिरी रंगाचे अतिशय गढूळ पाणी नळांमधून वाहत आहे. नागरिक तरीही भांड्यावर चाळणी ठेवून त्यावर कापडाचे अनेक थर ठेवून पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, अशा प्रयत्नात कापडात मातीचा गाळ आणि चिखलाचा थर दिसून येत आहे. असे अस्वच्छ व गढूळ पाणी प्राशन केल्यास नागरिकांना अनेक आजारांना बळी पडावे लागेल. 

आरोग्य केंद्रांमध्ये वाढली रुग्णांची संख्या

सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असल्याने आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात दूषित पाण्याने आजारी पडल्यास आरोग्य सुविधा मिळण्यास अनेक अडचणी येणार आहेत. म्हणून नगर परिषदेने येथील नागरिकांची समस्या जाणून घेत हा गढूळ पाण्याचा पुरवठा तत्काळ थांबवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT