vaccination e sakal
विदर्भ

लसीकरण केंद्र की कोरोना स्प्रेडर सेंटर? नागरिक तासन्‌तास रांगेतच

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वाढत्या रुग्णसंख्येसोबतच अपुरे लसीकरण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या लसीकरण केंद्रांवर उसळणारी गर्दी पाहता हे केंद्र आहे की कोरोना स्प्रेडर सेंटर, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बहुतेक सर्व लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला असून लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील 135 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शासकीय तसेच खासगी केंद्रांचाही समावेश आहे. सुरुवातीला लस घेण्यास फारसे उत्सुक नसलेल्या नागरिकांनी मात्र आता लसीचे महत्त्व जाणून लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी सुरू केली आहे. पहाटे सहापासूनच रांगा लावण्यात येत असून अपवाद वगळता बसण्याची किंवा कडाक्‍याच्या उन्हापासून संरक्षणाची कुठलीही व्यवस्था केंद्रांवर दिसत नाही. रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग दिसून येत नाही. अनेकजण तर मास्क नाकाखाली घेऊन चर्चा करतात. सध्या लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांची गर्दी झालेली आहे. जवळपास सर्वच लसीकरण केंद्र गर्दीने फुलून गेली आहेत. रांगेत तासन्‌तास उभे असतानाही सोशल डिस्टन्सिंगची कुठलीही व्यवस्था याठिकाणी नसल्याने अनेकांना ते सहन करावे लागते. पयार्याने लसीकरण केंद्र कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुढारी झालेत बेपत्ता -

एरवी कुठल्याही मुद्यावर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधणारे पुढारी सध्या गायब झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच उन्हातान्हात आपला नंबर केव्हा येणार, याची वाट पाहत असतात. अनेकांकडे पिण्याचे पाणीसुद्धा नसते. शिवाय लसीकरण होणार की नाही, याचाही पत्ता नसतो. अशा अडचणींच्या वेळी कुणीतरी आपल्यासाठी आवाज उठवावा, अशी माफक अपेक्षा नागरिकांची असते. मात्र, सद्या पुढारी बेपत्ता झाल्याचेच दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT