Permission to visit immediately after hearing the names of Shiv Sena chiefs 
विदर्भ

शिवसेनाप्रमुखांचे नाव ऐकताच भेटीची परवानगी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : "आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत. "एनकाऊंटर मॅन'चे अभिनंदन करायचे आहे. त्यांची भेट घालून द्या', अशी विनंती अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांना केली. मात्र, उपयोग झाला नाही. जेव्हा "आम्ही हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, अशी ओळख सांगितली, तेव्हा सायबराबाद येथील पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी भेटण्याची परवानगी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाविषयीचा आदर बघून आमचा ऊर अभिमानाने भरून आला, असे उद्‌गार शिवसेनेचे यवतमाळ उपशहर प्रमुख गिरीश व्यास यांनी काढले. ते तेलंगणा येथून परतल्यावर दै. "सकाळ'शी बोलत होते.

हैदराबाद येथील डॉक्‍टर तरुणीवर चार नराधमांनी अत्याचार करून जिवंत जाळल्याच्या घटनेने देश हादरला. त्या नराधमांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत होती. तेलंगणा पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये ते चारही नराधम ठार झाले. ही कारवाई सायबराबाद येथील पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांच्या नेतृत्वात पार पडली. त्यामुळे सज्जनार "एनकाउंटर मॅन' म्हणून प्रसिद्धीस आले. महिलांनी राखी बांधून त्यांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर कौतुक झाले.

यवतमाळच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रीयन जनतेच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त सज्जनार यांची भेट घेण्याचे ठरविले. त्यांनी तेलंगणा तर गाठले. मात्र, त्यांची भेट होणे कठीणच दिसू लागले. एनकाऊंटरची कायदेशीर चौकशी केली जात आहे. अशा परिस्थितीत सज्जानार यांची भेट घेण्यासाठी पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांना गिरीश व्यास आणि प्रभृतींनी साकडे घातले. मात्र, नकारच मिळाला. अखेर आम्ही महाराष्ट्रातून शिवसेनेचा निरोप घेऊन आलो, असे सांगितले. हाच निरोप सज्जनार यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी भेटीसाठी बोलावून घेतले.


सज्जनार यांच्या हृदयातही शिवसेनाप्रमुख

यवतमाळ शिवसेनेचे उपशहर प्रमुख गिरीश व्यास, चेतन सिरसाठ, दीपक सुकळकर, चेतन जगताप, दीपक सुकळकर व श्रीकृष्ण बुरेवार यांनी प्रत्यक्ष सज्जनार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. कौतुकाचा वर्षावही केला. पोलिस आयुक्त सज्जनार यांनी मुंबईत काही काळ पोलीस खात्यात सेवा केली असून आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्याशी संवादही साधला.


पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

हैदराबाद येथील पीडित डॉक्‍टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसैनिकांनी सांत्वन केले. त्याच दिवशी दशक्रियाविधीचा कार्यक्रम होता. तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांतील अश्रू बघून आम्हीही अश्रू रोखू शकलो नाही, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

लोकांना वाटतं की मी... मांजरेकरांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिद्धार्थ बोडकेला घेण्याचं कारण

Latest Marathi News Live Update : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

SCROLL FOR NEXT