Planting of vegetables in remote areas in collaboration with the police Happiness among farmers 
विदर्भ

पोलिसांच्या सहकार्याने दुर्गम परिसरात भाजीपाला लागवड; शेतकऱ्यांमध्ये आनंद

अविनाश नारनवरे

भामरागड (जि. गडचिरोली) : अतिदुर्गम, नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्‍यात आजही शेतीचा फारसा विकास झालेला नाही. येथील नागरिक खरिपातील धानाचेच पीक घेतात. त्यामुळे वर्षभर शेतीत पिकत नसल्याने त्यांना विशेष लाभ होत नाही. पण, लाहेरी पोलिस स्टेशनने आता येथील शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी मदत करणे प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे.

कृषिप्रधान असलेल्या भारत देशात जरी औद्योगीकरण, सेवा क्षेत्राचा देशाअंतर्गत उत्पन्नात झपाट्याने वाढ होत असली तरी आजही मोठी रोजगारनिर्मिती कुशल व अकुशल दोन्ही क्षेत्रात पुरवण्याचे सामर्थ्य कृषिक्षेत्रामध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबदेखील या क्षेत्रात करून उन्नती साधण्याचा प्रयत्न होताना दिसतो. परंतु, गडचिरोलीसारखा नैसर्गिक संसाधनांनी संपन्न प्रदेश आजही कृषी नावीन्य व आर्थिक नियोजनाच्या माहितीअभावी पारंपरिक पद्धतीने शेती करून आपली गुजराण करतो. परिणामी हलाखीचे जीवन जगणे भाग पडते.

याच जाणिवेतून उप पोलिस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपनिरीक्षक अजय राठोड, विजय सपकाळ, महादेव भालेराव, पोलिस हवालदार तुकाराम हिचामी, पोलिस शिपाई ईश्‍वरलाल नैताम, डेव्हिड चौधरी आदींच्या मदतीने लाहेरी येथील शेतकरी सुधाकर कोवासे यांना याबाबत माहिती दिली व प्रवृत्त केले.

शेतकऱ्यास मशागतीसाठी, पाणी देण्यासाठी डिझेल पुरवण्यात आले. त्याचबरोबर बियाणेही पुरविले. परिणामी या शेतकऱ्याने शेतावर सेंद्रिय खतांचा वापर करून भाजीपाला लागवड केली आहे. या भाजीपाल्यास भविष्यात योग्य भाव न मिळाल्यास योग्य दरामध्ये सर्व भाजीपाला लाहेरी पोलिस खरेदी करणार आहेत. हा कृतीमय छोटासा प्रयत्न येथील शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.

अनेक प्रकारची मदत

लाहेरी येथील पोलिस स्टेशनच्या वतीने केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील अनेक प्रकारची मदत केली जाते. येथे पोलिसदादा लोरा खिडकी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना अनेक प्रकारची मदत करण्यात येते. त्यांच्या समस्या जाणून घेत सोडविण्यासाठी संबंधित सरकारी विभागाकडे पाठपुरावा करण्यात येतो. त्यांना विविध सरकारी योजना मिळवून देण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT