Poison taken by a widow with a young man 
विदर्भ

तरुणासह विधवा महिलेने घेतले विष, चार दिवसांपासून होते बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

भिडी (जि. वर्धा) : वाबगाव येथील 35 वर्षीय विधवा महिला व 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे दोघे मागील चार दिवसांपासून गावातून बेपत्ता होते. गावालगत नाल्याच्या पुलाखाली ते अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

वाबगाव येथील या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तिला दोन मुले आहेत. गौरव विजय भागवत नामक युवकही याच गावात राहतो. हे दोघे मागील चार दिवसांपासून गावातून बेपत्ता होते. नातलग त्यांचा शोध घेत होते. गौरवजवळ असलेल्या दुचाकीने हे दोघे बाहेरगावी फिरत होते. गुरुवारी (ता. चार) सायंकाळी ते गावाजवळ येऊन एका शेतात रात्रभर थांबले. मध्यरात्रीनंतर तीन ते चार वाजताच्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले व तेथून रत्नापूर-वाबगाव मार्गावरील पुलाखाली येऊन थांबले.

विषाचा अंमल सुरू झाल्याने दोघेही अत्यवस्थ स्थितीत पडून राहिले. दुचाकी नाल्याच्या बाजूला खाली पडून होती. दरम्यान, गावातील नागरिकांना दुचाकी पडून असल्याचे दिसले. त्यांनी शोध घेतला असता गौरव आणि महिला पुलाखाली अत्यवस्थ स्थितीत पडून असल्याचे दिसले. लागलीच पोलिस पाटील यांना माहिती देण्यात आली. दोघांनाही तातडीने भिडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

विष प्राशन केल्यानंतर बराच वेळ पडून असल्याने विष संपूर्ण अंगात पसरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची देवळी ठाण्यात नोंद असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

SCROLL FOR NEXT