buldana polis.jpg
buldana polis.jpg 
विदर्भ

तरी शेकडो नागरिक रस्त्यावर, मग चालला पोलिसांचा दंडुका

सकाळ वृत्तसेवा

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : जिल्ह्यात कलम 144 लागू असतानाही काही कारण नसतानाही शेकडो नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रभाव थांबविण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनेला सुरुंग लागत आहे. दरम्यान, आठवड्यात कोरोना प्रभाव थोपविण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येत असून, दळणवळण साधनेही बंद करण्यात आली आहे. यावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पोलिस प्रशासनाला आता दंडुका हाती घेऊन विनाकारण फिरणाऱ्या मज्जाव करण्याचे निर्देश सोमवारी (ता.23) दिले.

पोलिसांना करावा लागत आहे बळाचा वापर
पालकमंत्र्यांचे निर्देश मिळताच ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त घालत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडुका चालवीत घरीच राहण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात सर्व यंत्रणा कोरोना थांबविण्यासाठी ठप्प करण्यात येऊन सुट्टी देण्यात आली आहे. तरी, नागरिकांनी घरी थांबून सुरक्षित उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन मला काही होणार नाही असा गैरसमज ग्राह्य धरत रस्त्यावर विनाकारण फेरफटका मारण्याचे प्रकार होत आहे. वारंवार सूचना आणि आवाहन केल्यानंतरही नागरिकांची मानसिकता बदल नसल्यामुळे अखेर पोलिस प्रशासनाला आता बळाचा वापर करत नागरिकांना घरी राहण्यासाठी निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. नागरिकांना कोरोना व्हायरस प्रभाव हा गांभीर्याने घेत आपला व कुटुंबियांची सुरक्षेसाठी घराच्या बाहेर 31 मार्चपर्यंत शक्यता पडूच नये असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, दुपारी शहरातील विविध चौकात पोलिसांनी दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना अडवत त्यांना घरी राहण्याची सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT