Police beat farmers for breaking lockdown rules Amravati news 
विदर्भ

पोलिसांनी घेतला लॉकडाऊनचा गैरफायदा; शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शशांक देशपांडे

दर्यापूर (जि. अमरावती) : कोरोनासंबंधी लॉकडाऊनचे नियम घोषित झाल्यावर दर्यापूरमध्ये प्रशासन अलर्ट झाले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत आहे. अशातच दर्यापूरमध्ये लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचा चांगलाच प्रसाद मिळाला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दर्यापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.

दर्यापूरमध्ये एसटी स्टॅण्ड चौकात दुचाकीवर डिझेल घेण्यासाठी दोन युवा शेतकरी जात असताना ड्युटीवर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शंकास्पद वाटल्याने तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन्ही युवकांना काठीने प्रसाद दिला. ही घटना बघत असणाऱ्या काही लोकांनी याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे दर्यापूरमध्ये नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात शेतीसंबंधात कामे करण्याची मुभा शासनाने दिली आहे, असे असताना शेतकऱ्यांना झालेली मारहाण दर्यापुरात चर्चेचा विषय ठरली आहे. सदर व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागितला असल्याचे कळते. या प्रकारावर मारहाण करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची
सदर घटना लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांमुळे झाली आहे. याबाबत पोलिसि कर्मचाऱ्यांना बोलावून समज दिली आहे. नागरिकांनी जाहीर झालेले नियम काटेकोरपणे पाळावे, अशी आमची विनंती आहे. पोलिस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. 
- प्रमेश आत्राम,
ठाणेदार, दर्यापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT