अमरावती : काही कारण नसताना शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांची संख्या कमी व्हावी, यासाठी शहरातील पेट्रोलपंपावरही पोलिस तैनात (Police deployed at petrol pump) करण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल विक्रीवर निर्बंध (Restrictions on sale of petrol) आले. रविवारी (ता. नऊ) दुपारी बारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन रस्त्यावर (Police administration on the streets) उतरले आहे. (Police deployed at petrol pumps Amravati news)
शहरातील काही पेट्रोलपंपांवर नागरिकांची गर्दी वाढली. तेथील फोटो लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर पाठविले. शिवाय काहींनी थेट पेट्रोलपंपावरील गर्दी वाढत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याकडे केल्या. दुपारी बारानंतर बहुतांश पेट्रोलपंपांसमोर वाहने आत येऊ नये, यासाठी परिसरात बॅरिकेटिंग करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते.
काहींनी ती व्यवस्था करून सर्वसामान्यांसाठी पेट्रोल विक्री बंद केली होती. त्यामुळे काहींना निराश होऊन परत जावे लागले. तक्रारीनंतर पोलिस आयुक्त यांनी सहा ते सात पेट्रोलपंपांवर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पेट्रोल भरणाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांनीच समज दिली. येथे गर्दी होऊ नये, यासाठी प्रत्येक ठिकाणी दुपारनंतर दिवसभरासाठी पोलिसांना तैनात केले.
प्रशासकीय आदेशानुसार अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनांकरिताच पेट्रोल मिळेल, असे सांगितले होते. परंतु, गर्दी वाढत असल्यामुळे काही ठिकाणी संबंधितांना समज दिली. नागरिकांनीही नियम पाळावे. एवढीच अपेक्षा आहे.- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती
(Police deployed at petrol pumps Amravati news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.