vinaybhang 
विदर्भ

ही तर माणुसकीची हद्दच! गावच्या रक्षकानेच केली विलगीकरण कक्षातील महिलेला शरीरसुखाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्याचे महसूल उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मद्यविक्रीचा परिणाम अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन दरम्यान प्रथमच समोर आला. दारूच्या नशेत एका पोलीस पाटलाने गावातील शाळेत असलेल्या विलगीकरण कक्षात जाऊन तेथील महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना जिल्ह्यातील वडगाव (वाजदी) येथे शुक्रवारी, 8 मे रोजी घडली. 

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह संपूर्ण देश सध्या चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. इतर व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मात्र, अशातच अमरावती जिल्ह्यात घडलेली एक संतापजनक घटना नुकतीच समोर आली. जिल्ह्यातील चांदूररेल्वे पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वडगाव (वाजदी) येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. 

शुक्रवारी, 8 मे रोजी गावातील पोलीस पाटील प्रदीप गजबे (वय ३६) हा दारू ढोसून शाळेत असलेल्या विलगीकरण कक्षात गेला. त्यानंतर तेथे असलेल्या महिलेला अश्‍लील शिवीगाळ करीत शरीर सुखाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास उपाशी ठेवण्याची धमकी सुद्धा तिला दिली. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला घाबरली. तिने आरडाओरड करीत सरळ विलगीकरण कक्षातून पळ काढला. शनिवारी, 9 मे रोजी तिने चांदूररेल्वे पोलीस ठाणे गाठून पोलिस पाटलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलीस पाटील प्रदीप गजबे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT