IMG-20200315-WA0012.jpg 
विदर्भ

पोलिस गस्तीवर; चोराच्या नजरा दानपेटीवर

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यात एकापाठोपाठ एक होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये वाढत्या चोऱ्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांच्या नजरा मंदिरातील दानपेट्यासह शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील मोटारीही असल्याचे दिसून येत आहे. गावा-गावात विनापरवाना विक्री होत असलेली दारू आणि वरली मटका खेळण्यासाठी पैशाची आवश्‍यकता असल्यामुळे भुरटे चोरांची संख्या दिवसेंनदिवस वाढत असल्याचे नागरिक बोलत आहेत.

श्‍वान पथकही झाले दाखल
वरवट बकाल येथील बस स्थानकच्या बाजूला असलेल्या पारस्कार कॉम्प्लेक्समधील संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी पळवून ती फोडण्यात आली. त्यामधील तीन ते चार हजार रुपयांचा ऐवज व चांदीच्या पादुका किंमत पाच हजार 500 रुपये चोरट्याने लंपास केले. ही घटना (ता.15) मार्चच्या सकाळी उजेडात येताच संजय भगवंतराव पारस्कर यांनी तामगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी बुलडाणा येथील फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठस्याचे नमूने घेतले. संध्याकाळी श्‍वान पथकासह पोलिस दाखल झाले होते. श्‍वानला चाबिचा वास देऊन चोरट्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला असता श्‍वान फक्त वरवट ते रिंगणवाडी रोडवर जाऊन थांबले. त्यामुळे श्‍वानचे काम स्थगित करण्यात आले. विशेष म्हणजे ज्यारात्री ही चोरी झाली त्याच रात्री तामगाव रोडवर गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी फिरत होती. त्याच रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मंदिरात देखील चोरांनी हात साफ केल्याचे निदर्शनास आले. यामध्ये दहा हजारचा ऐवज लंपास केला. त्याचप्रमाणे तामगाव येथील हनुमान मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील अंदाजे 15 हजार रुपयांवर हात साफ केला आहे. याबाबत विजय गोमासे यांनी पोस्टेला तक्रार दिली. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे सध्या चोरट्यांच्या नजरा मंदिरावर असून, पोलिसांना चोरांनी आव्हान केले आहे. पुढील तपास भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दीपक साळवे व सहकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT