गोंदिया : जप्त केलेल्या साहित्यांसह उपस्थित पोलिस.  
विदर्भ

पोलिसांनी नक्षल्यांच्या घातपाताचा प्रयत्न हानून पाडला, पेरून ठेवलेली स्फोटके केली जप्त

सकाळ डिजिटल टीम

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील गेंडूरझरिया जंगलात पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई आज, शनिवारी (ता. २६) संध्याकाळी करण्यात आली.

पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांना सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत दरेकसा घाटाजवळील गेंडूरझरिया पहाडी जंगलात घातपात घडवून पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिस अधीक्षक पानसरे यांच्या नेतृत्वात सी-६० सालेकसा येथील कमांडो पथक, बीबीडीएस पथक, सालेकसा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेंडूरझरिया पहाडी जंगलात शोध मोहीम राबविली.

श्‍वानपथकाद्वारे पाहणी

गेंडूरझरिया पहाडीच्या उतार भागात दगडाच्या एका कपारीमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याने श्वानपथक व बीडीडीएस पथकाने पाहणी केली. तेव्हा तेथे नक्षलवाद्यांनी स्फोटके साहित्य लपवून ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर ती स्फोटके बाहेर काढण्यात आली.

२७ नग इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर

या साहित्यामध्ये स्टील डबा, १५० नग स्फोटक कांड्या सिल्वर, २७ नग इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर असे स्फोटक साहित्य आढळून आले. प्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी जालींदर नालकुल करीत आहेत. पोलिसांनी नक्षल्यांच्या उद्देशावर पाणी फेरल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

DY Patil News : 'आजोबांचे संस्कार हीच माझी ताकद'; डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर नात राजलक्ष्मी पाटील यांनी सांगितल्या आजोबांच्या आठवणी

Farmer Loan Waiver: मंगळवेढ्यातील 2418 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफीचा लाभ; मरवडे गावातील सर्वाधिक लाभार्थी

SCROLL FOR NEXT