Khamgaon
Khamgaon 
विदर्भ

खामगाव: मटका, जुगार अड्ड्यावर छापा, 3 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त

सकाळवृत्तसेवा

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंद्याचे माहेरघर बनलेल्या खामगावात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने 29 मे रोजी औद्योगिक वसाहतीमधील एका मोठ्या बुकीचा वरली मटक्‍यांचा जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत 3 लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक शशिकुमार मीना, अप्पर पोलिस अधिक्षक श्‍याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने गोपनिय माहितीवरून शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या बुकीच्या जुगार अड्यावर छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून जुगार अड्डा चालवित असलेल्या 12 जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये राजकुमार रामगोपाल राठी वय 55 रा. बालाजी प्लॉट, अजय अवधुत भगत वय 32 रा.आठोडी बाजार नांदुरा, नारायणदास सिताराम भुतडा वय 72 रा.पुरवार गल्ली खामगाव, मुकेश भास्करराव चव्हाण वय 35 अभय नगर खामगाव, अक्षय संजय मोरे वय 22 रा.काळेगाव तालुका खामगाव, विठ्ठल महादेव राहणे वय 35 रा. स्नेहल नगर वाडी, समिर महेंद्र मंत्री वय 39 बारादरी खामगाव, योगेश नंदकिशोर हिवराळे वय 30 दालफैल खामगाव, पंकज विनोद सोमानी वय 39 रा.शामल प्लॉट खामगाव, राकेश श्रीराम हिरवाने वय 42, राजेंद्र मदनलाल हिनवाने वय 47 दाल फैल खामगाव, प्रकाश नामदेव इंगळे रा. काळेगाव ता.खामगाव अशा 12 आरोपींचा समावेश आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक रूपेश शक्करगे, पोलिस कर्मचारी बालाजी महाजन, श्री.कोल्हे, रविंद्र इंगळे, सुधाकर थोरात, नितीन भालेराव, रतन गिरी, राम धामोडे, विनायक मानकर, विक्रम राठोड, सैय्यद जावेद, सुनिल बायनडे, गवारगुरू यांनी केली. 

9 दुचाकी, 41 मोबाईलसह साहित्य जप्त
औद्योगिक वसाहतीमधील खामगावातील सर्वात मोठा जुगार अड्डा चालविल्या जात होता. पोलिसांनी तेथून 41 मोबाईल, 9 दुचाकी, टीव्ही, फ्रीज यासह विविध प्रकारचे जुगार साहित्य व नगदी असा एकुण 3 लाख 57 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाईलवर कोडवर्ड
पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जप्त केलेल्या मोबाईलवर इंग्रजीतील ए ते झेड अक्षरांचे कोडवर्ड आहेत. या ठिकाणी जुगार चालविण्यासोबतच लहान, मोठ्या वरली व्यावसायीकांकडून उतारा घेण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मोबाईलमधील डाटा व कागपत्रांची तपासणी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT