police take action against liquor seller in gadchiroli
police take action against liquor seller in gadchiroli 
विदर्भ

अलोणी जंगलात १ लाखांचा मोहसडवा नष्ट, दारूविक्रेत्यांचे दणाणले धाबे

मिलिंद उमरे

गडचिरोली : तालुक्‍यातील अलोणी-बोदली दरम्यान असलेल्या नाल्यालगत आठ ठिकाणी टाकलेला तब्बल 1 लाख रुपये किंमतीचा मोहसडवा व साहित्य गडचिरोली पोलिस व मुक्तिपथने संयुक्तरीत्या नष्ट केला आहे. ऍक्‍शन प्लॅननुसार गावातील मुजोर दारूविक्रेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.   

अलोणी या गावात दारूचा महापूर आहे. अलोणीत 30 ते 40 दारूविक्रेते सक्रिय आहेत. या गावाच्या माध्यमातून तालुक्‍यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरातसुद्धा दारू  पुरविली जाते. त्यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाली आहेत. झगडे-भांडणांचे प्रमाण अधिक झाले आहेत. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या अलोणी येथील जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबवत असताना अलोणी- बोदली दरम्यान असलेल्या नाल्यालगत आठ ठिकाणी 30 ड्रममध्ये मोहसडवा टाकला असल्याचे निदर्शनास आले. असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मोहसडवा व साहित्य नष्ट करण्यात आले. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ऍक्‍शन प्लॅननुसार तालुक्‍यातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू आहे. मुजोर गावातील दारूविक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्‍यातील दारूविक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात हवालदार रमेश उसेंडी, यशवंत मलगाम, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकूडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.    

उन्हाळ्यात वाढते प्रमाण -
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून मोहवृक्षांना बहर येतो. मोहफुले गळायला लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोहफुलांचे संकलन होते. अशावेळेस मोहसडवे टाकण्याचे प्रमाणही वाढते. या काळात नदी, नाल्यांच्या काठावर, जंगलात पाणथळ जागेच्या ठिकाणी किंवा दाट जंगलात, अशा अनेक ठिकाणी मोहाचे सडवे टाकण्यात येतात. त्यामुळे पोलिसांनी या अनुषंगानेही सडव्यांचा शोध घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT